युथ कॉंग्रेसची वाढीव बिलांच्या विरोधात मोहीम


ठाणे – कोरोनामुळे सर्वसामान्य माणुस मेटाकुटीला आला असताना खाजगी रुग्णालयांकडून कोविडग्रस्त रु ग्णांची अक्षरश: लूट सुरु आहे. हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी किंबहुना खाजगी रु ग्णालयांच्या या लुटीला चाप बसावा, ठाण्यातील युथ काँग्रेस सरसावली आहे. महाराष्ट्र प्रदेश युथ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या निर्देशानुसार, युथ काँग्रेसचे ठाणे जिल्हाध्यक्ष आशिष गिरी यांनी ही मोहीम सुरु केली आहे.
त्यानुसार, ठाण्यातील प्रत्येक खाजगी कोविड रु ग्णालयाबाहेर फलक दर्शवुन जनजागृती करण्यात आली असुन ठाणो शहरातील बाजारपेठेतील काँग्रेस मुख्य कार्यालय आणि नौपाडा,बी कॅबिन या दोन ठिकाणी कोविड वॉर रूम सुरू करण्यात आले आहेत. याप्रसंगी बोलताना, आशीष गिरी यांनी, ठाण्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने सरकारी रु ग्णालये कमी पडत आहेत. त्यातच खाजगी रु ग्णालये अव्वाच्या सव्वा बिले आकारून रु ग्णांची लूट करीत आहेत. मध्यंतरी बिलासाठी एका रु ग्णाची रिक्षादेखील जप्त करण्याचा प्रकार घडला होता. यावर आळा घालण्यासाठी युथ काँग्रेसने पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानुसार, हरिदास यादव, तेजस घोलप, दिपक पाठक, अजित ओझा, आदींसह इतर सहका:यांच्या मदतीने युथ काँग्रेस गोरगरीब रु ग्णांच्या मदतीसाठी सरसावली असल्याचे त्यांनी सांगितले. ज्या रु ग्णांची अथवा नातेवाईकांची केवळ बिलांसाठी अडवणुक होत असेल त्यांनी ९८६७४४८३८३ या क्र मांकावर अथवा वरील हॅश टॅगवर नो एक्स्ट्रा कोवीड १९ बील यावर ट्वीट करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संपूर्ण देशात कोरोनाने हाहाकार माजविला आहे. अतिशय वाईट परिस्थिती आहे, परंतु अशातच अव्वाच्या सव्वा बिले खाजगी रुग्णालयांकडून लुट सुरु आहे. बीले अदा केला शिवाय मृतदेह देखील दिला जात नाही. त्यामुळेच युवक कॉंग्रेसच्या वतीने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार वाढीव बिलांचा प्रकार सहन केला जाणार नसून वेळप्रसंगी हॉस्पीटल बाहेर आंदोलन केले जाईल.
(विक्रांत चव्हाण – शहर अध्यक्ष – कॉंग्रेस, ठाणे )

 337 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.