निरंजन डावखरे, मयुरेश जोशींच्या कल्पनेतून भाजपा ठाणे शहर- प्लाझ्मा हेल्पलाईन सुरू

देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण, मे महिन्यात ६०० रुग्णांना प्लास्मा

ठाणे – ठाणे शहरातील कोरोना रुग्णांसाठी सुरू करण्यात आलेल्या ऑनलाईन प्लाझ्मा हेल्पलाईनचे अनावरण विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज करण्यात आले. भाजपाचे आमदार व जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे व भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मयुरेश जोशी यांच्या संकल्पेतून हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे.
ठाणे शहरातील कोरोना रुग्णांच्या नातेवाईकांची औषधे, बेड आणि प्लाझ्मासाठी प्रचंड धावपळ होत आहे. भाजपातर्फे प्लाझ्मा मिळविण्यासाठी हेल्पलाईन सुरू करण्यात आल्यामुळे रुग्णांना मदत मिळणार आहे. हेल्पलाईन पोर्टल ड्यूएल मोड पद्धतीने चालणार आहे. प्लाझ्माची आवश्यकता असलेल्या रुग्णांना प्लाझ्मा मिळेल. तर ज्यांना प्लाझ्मा दान करावयाचा आहे, त्यांनाही मार्गदर्शन केले जाईल. त्यासाठी कोरोना आजारातून बरे झालेल्या ठाणे शहरातील रुग्णांना संपर्क करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. उद्यापासून दररोज २० याप्रमाणे महिन्याभरात किमान ६०० रुग्णांना हेल्पलाईनमार्फत प्लाझ्मा उपलब्ध होईल, असे यावेळी मयुरेश जोशी यांनी सांगितले.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या www.bjpthane4plasma.co.in या हेल्पलाईनचे कौतूक केले. कोरोनामधून बरे झालेल्या ठाणेकरांनी या हेल्पलाईनच्या माध्यमातून अधिकाधिक प्लाझ्मा दान करुन गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहनही श्री. फडणवीस यांनी केले. या वेळी भाजपाचे महापालिकेतील गटनेते मनोहर डुंबरे, जिल्हा सरचिटणीस विलास साठे, मयुरेश जोशी, युवामोर्चाचे समर्थ नायक आदी पदाधिकारी उपस्थित होते.

 789 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.