ठाणे – ठाण्यात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रुग्णांना रेमडेसिवर, बेड मिळणो मुश्किल होत आहे. मृत्युदरही वाढत आहे. परंतु ठाणो महापालिकेला अद्यापही सक्षम असा आरोग्य अधिकारी मिळालेला नसल्याची खंत भाजपचे आमदार संजय केळकर यांनी व्यक्त केली आहे. डॉ. चारुदत्त शिंदे यांना यापूर्वी काढून टाकण्यात आले होते. परंतु आता त्यांनाच पुन्हा सेवेत का घेतले असा सवाही त्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या भेटीदरम्यान उपस्थित केला आहे. यात महापालिकेची चुक नसून ठाणो जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचेच दुर्लक्ष होत असल्याने महापालिकेला अद्यापही पूर्ण वेळ सक्षम असा आरोग्य अधिकारी मिळू शकला नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
ठाण्यात दिवसागणिक कोरोना बाधीत रुग्णांची संख्या वाढत आहे. मागील काही दिवसात रुग्णांची संख्या कमी होत असली तरी मृत्युदर हा वाढताच आहे. रुग्णांना रेमडेसिवर उपलब्ध होणो कठीण झालेले आहे. महापालिकेच्या कोवीड सेंटरमध्ये आजही सावळा गोंधळ सुरु आहे. ऑक्सीजनचा पुरेसा साठा अद्यापही उपलब्ध होऊ शकलेला नाही. खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांच्या मिटींग घेतल्या गेल्या. मात्र त्यात आम्ही ज्या काही सुचना दिल्या त्यांचा अंतर्भाव करण्यात आलेला नाही. एकूणच एकनाथ शिंदे यांचे ठाण्याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे. रुग्ण संख्या वाढत असतांना त्याठिकाणी सक्षम आरोग्य अधिकारी नेमणो गरजेचे असतांना तसे न करता आपल्या मर्जीतील अधिका:याला पुन्हा महापालिकेत कशासाठी आणले असा सवालही त्यांनी केला आहे. यापूर्वी डॉ. राजू मुरुडकर यांच्यावर देखील प्रभारी कार्यभार सोपविण्यात आला होता. त्यानंतर डॉ. वैजयंती देवगीकर यांच्यावरही प्रभारी कार्यभार देण्यात आला. आता पुन्हा डॉ. चारुदत्त शिंदे यांच्या खांद्यावर प्रभारी पदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
वास्तविक पाहता कोरोनाच्या पहिल्या लाटेत देखील शिंदे यांना घेण्यात आले होते. परंतु त्यांच्याकडून योग्य पध्दतीने कोरोनाची परिस्थिती हाताळली न गेल्याने त्यांना परत पाठविण्यात आले होते. असे असतांना पुन्हा त्यांना का घेतले असा सवालही त्यांनी केला आहे. त्यामुळेच ठाणो महापालिकेत आता पूर्णवेळ मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी नेमण्यात यावा, जेणो करुन कोरोनाची परिस्थिती नियंत्रणास आणण्यास मदत होईल त्या दृष्टीकोणातून तशा अधिका:याची नेमणुक करावी अशी मागणी देखील त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.
460 total views, 1 views today