करोना व्यवस्थापन कार्यात सैन्यदलातील निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा घेण्याची राज्यपालांची सूचना

मुंबई : सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या राज्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा करोना व्यवस्थापन कार्यात घेण्यात याव्या, अशी सूचना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी एका बैठकीच्या वेळी केली.शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव सीमा व्यास व सैनिक कल्याण मंडळाचे अधिकारी यांचेशी राज्यपालांनी मंगळवारी (दि. २७) दूरस्थ माध्यमातून चर्चा केली, त्यावेळी त्यांनी उपरोक्त सूचना केली.

सैन्य दलातील अधिकाऱ्यांना समाजात सन्मान व प्रतिष्ठा आहे. त्यामुळे सैन्य दलातून निवृत्त झालेल्या वैद्यकीय तसेच बिगर वैद्यकीय अधिकारी व जवानांची देखील करोना विषयक कार्यात मदत घेतल्यास त्याचा राज्याला लाभच होईल असे राज्यपालांनी सांगितले.

 365 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.