शुभम शिंदेच्या रूपाने रत्नागिरीला सलग दुसऱ्या वर्षी नेतृत्वाचा बहुमान


राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता महाराष्ट्राचा पुरुष संघ जाहीर.

  मुंबई : भारतीय हौशी कबड्डी महासंघाच्या मान्यतेने, उत्तर प्रदेश राज्य कबड्डी संघटनेच्या विद्यमाने  १३ ते १६ एप्रिल या कालावधीत अयोध्या येथे होणाऱ्या “६८व्या वरिष्ठ पुरुष गट राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेकरिता”  महाराष्ट्राने आपला संघ जाहीर केला. १७ व १८ मार्च  या कालावधीत बारामती स्पोर्ट्स अकादमी, बारामती यांच्या सौजन्याने घेण्यात आलेल्या मैदानी चाचणी स्पर्धेतून हा संघ निवडण्यात आला. या संघात मुंबई शहर, ठाणे, रत्नागिरी व नांदेडचे २-२ खेळाडूंचा  समावेश आहे. गतवर्षी महाराष्ट्राची मजल उपांत्यपूर्व फेरी पर्यंतच सिमित राहिली होती. गतवर्षीचा संघ पूर्णपणे नवोदित व नव्या उमेदितील खेळाडूंचा होता.
   संघाचे सराव शिबीर बारामती स्पोर्ट्स अकादमी येथे मॅट वर २७ मार्च पासून  ८एप्रिल पर्यंत सुरू होता.  १२ एप्रिल रोजी दुपारी हा संघ मुंबई विमानतळावरून हवाई मार्गे स्पर्धेकरिता रवाना होईल. महाराष्ट्र राज्य कबड्डी संघटनेचे सरकार्यवाह आस्वाद पाटील यांनी एका परिपत्रकाद्वारे आज हा संघ प्रसार माध्यमांकरिता जाहिर केला. महाराष्ट्राचा निवडण्यात आलेला संघ खालील प्रमाणे.
पुरुष संघ : १)शुभम शिंदे (संघनायक)- रत्नागिरी, २)पंकज मोहिते – मुंबई शहर, ३)सुनिल दुबिले – नांदेड, ४)सिद्धार्थ देसाई – नांदेड, ५)सुधाकर कदम – पुणे, ६)गिरीश इरनाक – ठाणे, ७)रिशांक देवडिगा – मुंबई उपनगर, ८)अजिंक्य पवार – रत्नागिरी, ९)मयूर कदम – रायगड, १०)दादासाहेब आव्हाड – नंदुरबार, ११)निलेश साळुंखे – ठाणे, १२)सुशांत साईल – मुंबई शहर.
प्रशिक्षक : प्रशांत सुर्वे , रत्नागिरी, व्यवस्थापक : बजरंग परदेशी, नंदुरबार.

 1,760 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.