रियाज बाटे यांची सचिवपदी निवड , दिर्घ पल्ल्याच्या शर्यतीचे आयोजन करण्याचा नवीन कार्यकारी मंडळाचा मानस
मुंबई : मुंबई शहर हौशी सायकलिंग संघटनेच्या अध्यक्षपदी विद्यमान अध्यक्ष अनिल तांबे यांची फेरनिवड करण्यात आली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळून परळ येथील डॉ शिरोडकर हायस्कुलच्या सभागृहात पार पडलेल्या संघटनेच्या सर्वसाधारण सभेत आगामी तीन वर्षांच्या कालखंडाकरता नवीन कार्यकारणी मंडळाची एकमताने निवड करण्यात आली. त्यात माजी राष्ट्रीय सायकलपटू आणि संघटक रियाज बाटे यांच्याकडे सचिवपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. संघटनेच्या नव्या कार्यकारिणी मंडळात माजी महिला सायकलपटूनाही स्थान देण्यात आले आहे. त्यामध्ये उल्का ठाकूर आणि फिरोझा सुरेश यांची उपाध्यक्षपदावर निवड करण्यात आली. तर सिमरन अंसारी आणि लक्ष्मी गुप्ता यांना कार्यकारी सदस्य म्हणून स्थान देण्यात आले आहे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गतवर्षी संघटनेच्या नियमित शर्यतीचे आयोजन करता आले नव्हते. त्यामुळे पुढील काळात कोरोनाचा अंमल कमी झाल्यावर मुंबई जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा, शालेय स्पर्धा आणि दिर्घ पल्ल्याच्या सायकलिंग शर्यतीचे आयोजन करण्याचा विचार असल्याचे अध्यक्ष अनिल तांबे आणि सचिव रियाझ बाटे यांनी सांगितले.
संघटनेची नवी कार्यकारिणी
अध्यक्ष – अनिल तांबे
उपाध्यक्ष – सुभाष पोवळे, किशोर श्रीराम, उल्का ठाकूर, फिरोझा सुरेश.
सचिव – रियाझ बाटे.
सहसचिव – चंद्रकांत वायकर, विजय दवंडे, महेश अजिंक्य.
खजिनदार – अंकुश साळुंखे.
सह खजिनदार – रमेश मयेकर.
कार्यकारिणी सदस्य- सिमरन अंसारी, लक्ष्मी गुप्ता, राजेंद्र वाघमारे, ऋषिकेश भोळे.
792 total views, 1 views today