किन्हवली गटात विविध विकासकामे मार्गी

जिल्हापरिषद सदस्या कांचन साबळे यांच्या प्रयत्नांना यश

शहापूर (शामकांत पतंगराव) : ठाणे जिल्हा परिषदेच्या किन्हवली गटातील सदस्या कांचन साबळे यांच्या प्रयत्नाने अनेक ठिकाणी विविध विकास कामे मार्गी लागली आहेत.आदिवासी वाडी वस्त्यांवर रस्ते,पिण्याचे पाणी यांना प्राधान्यक्रम दिला असून अन्याय ठिकाणीसुद्धा अशा प्रकारची कामे सुरू असल्याने नागरीकांनी समाधान व्यक्त केले आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या किन्हवली गटातील
सदस्या कांचन अविनाश साबळे यांनी आपल्या मतदार संघात विकासकामांचा झंझावात सुरू केला आहे.किन्हवली -शीळ रस्त्यासाठी ७७ लक्ष रुपये, बाभले रस्त्यासाठी ९३ लक्ष रुपये, खराडे-बोन्द्रेपाडा नळपाणी पुरवठा योजनेसाठी २६ लक्ष रुपये,टाकीपठार येथे भक्त निवासासाठी ५५ लक्ष रुपये,लवले येथील कपालेश्वर मठाच्या रस्त्यासाठी ४० लक्ष, नायक्याचा पाडा अंगणवाडी इमारतीसाठी ९ लक्ष ४० हजार
रुपये,तसेच ३०/५४ या लेखाशीर्ष अंतर्गत शीळ रस्त्यासाठी २० लक्ष,ठुणे शाळेसमोर मुख्य रस्ता काँक्रीटीकरण ३० लक्ष,शेलवली(बां) पेव्हरब्लॉक बसविणे ५ लक्ष,कब्रस्थान संरक्षक भिंत तयार करणे ११ लक्ष व नंबरवाडी येथे रस्त्यासाठी साडेसात लक्ष रुपये असा कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यातील काही कामे प्रगतीपथावर आहेत.
अनेक ठिकाणी गाव अंतर्गत सिमेंट काँक्रीट व पेव्हरब्लॉकचे रस्ते बनविले आहेत.अनेक वर्षांपासून रखडलेला आष्टे-खरीड रस्त्याचे डांबरीकरण केले आहे. पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य असलेल्या ठुणे, तुकारामपाडा, कातकरीवाडी, आंबेखोर,लवले या ठिकाणी बोअरवेल मारून पाणीप्रश्न निकाली काढला आहे.
जागा उपलब्ध होत नसल्याने वर्षानुवर्षे प्रलंबित किंवा अपूर्णावस्थेतीतील अनेक योजनांसाठी शेतकऱ्यांशी चर्चा करून भूसंपादन केले व योजना मार्गी लावल्या आहेत.यासाठी कांचन साबळे यांना त्यांचे पती व उद्योजक अविनाश साबळे यांची वेळोवेळी मदत होते.

 592 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.