दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घ्या

आमदार संजय केळकर यांनी नाले सफाई पाहणी दौऱ्यादरम्यान अधिकाऱ्यांना केली सूचना.

ठाणे : आमदार संजय केळकर यांनी के व्हीला, राबोडी परिसरातील नालापहाणी दौरा महापालिका अधिकाऱ्यांसह केला. हा नाला १२ मीटर पासून १८ मीटर करण्यात येणार असून यात बाधित होणाऱ्या कुटुंबांना अगोदर कल्पना देण्यात यावी तसेच त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था ही व्हावी अशी सूचना आमदार केळकर यांनी महापालिका अधिकाऱ्यांना करून नाला सफाई मे महिन्याच्या १५ तारखेपर्यंत करावी अशीही सूचना आमदार  केळकर यांनी यावेळी केली. यावेळी शेकडो स्थानिक नागरिक उपस्थित होते. स्थानिक राहिवासीयांच्या मनातील गैरसमज महापालिका अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत आमदार केळकर यांनी दूर केल्याने राहिवासीयांनी समाधान व्यक्त केले.
मागील काही महिन्यांत आमदार केळकर यांनी वृंदावन, बाळकूम येथीलही नालासफाईची पाहणी संबंधित महापालिका अधिकाऱ्यांसह केली होती. त्यावेळीही आमदार केळकर यांनी नालेसफाई बाबत महापालिका आयुक्तांकडे नाराजी व्यक्त केली होती.
काही दिवसांपूर्वी आमदार केळकर यांनी महापालिका आयुक्त यांच्यासह सर्व विभागातील अधिकाऱ्यांची एक बैठक आयोजित केली होती तेव्हा ही नालेसफाईचा मुद्दा समोर आला होता त्यावेळी आमदार केळकर यांनी वेळच्या वेळी नालेसफाई झाली पाहिजे शिवाय दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घेण्यात यावा अशी मागणी आयुक्तांकडे केली असता त्यांनीही ही बाब मान्य करून तशा सूचनाही संबंधित अधिकाऱ्यांना त्यावेळी दिल्या होत्या. मात्र तसे होताना दिसत नसल्याने नालेसफाई योग्य रीतीने होत नाही. त्यामुळे दर दोन महिन्यांनी नालेसफाईचा आढावा घेण्यात यावा या मागणी करिता आग्रही राहणार असल्याचेही आमदार केळकर यांनी बोलताना सांगितले.

 552 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.