अखेर सायकल स्टॅन्डचे वादग्रस्त कंत्राट होणार रद्द

भ्रष्टाचार विरोधी लढय़ाला मिळाले यश – मृणाल पेंडसे

ठाणे : ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाडेतत्वावर सायकलींच्या बदल्यात कोट्यवधी रुपयांचे जाहिरातीचे हक्क पदरात पाडून घेणाऱ्या कंत्राटदाराचे हक्क रद्द करण्यासंदर्भातील प्रस्ताव मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उचलल्यानेच हा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे मत भाजपचे ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी व्यक्त केले आहे. महापालिका आयुक्तांनी हे पाऊल उचल्याने त्यांचे देखील आभार.
ठाणे शहर स्मार्ट सिटी होणार असल्याची चर्चा घडवून तसेच नागरिकांचे आरोग्य चांगले रहावे म्हणून, मे. न्यू. एज. मिडीया पार्टनर प्रा. लि. या कंपनीला शहरातील महत्वाच्या ५० ठिकाणी स्टॅण्डसाठी मोफत जागा देण्यात आली. त्याचबरोबर खेवरा सर्कल येथील महापालिकेच्या इमारतीतील दोन मजले मोफत दिले गेले. तर सायकल स्टॅण्डवर होणा:या जाहिरातीसाठी महापालिकेकडून कोणताही कर आकारला जात नाही. त्याबदल्यात या कंपनीने सुमारे अडीच वर्षांपूर्वी केवळ ५०० सायकली दिल्या. या सायकलची किंमत केवळ १७ लाख ५० हजार रु पये होती. इतकेच नव्हे तर महासभेत ठराव एका कंपनीच्या नावे, आणि करार दुसऱ्या कंपनीच्या नावे, अशी किमयाही साधली होती. त्या विरोधात आम्ही आवाज उठविला होता. यात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोपही महासभेत मी केला होता.आणि वेळोवेळी त्याचा पाठपुरावाही केला होता.
त्यानुसार आता हा प्रस्ताव महासभेत रद्द करण्यासाथो आणण्यात आला असल्याने आयुक्तांचे या निमित्ताने आभार मानते. . यापुढे देखील आम्ही महापालिकेत चुकीच्या पध्दतीने सुरु असलेल्या कामांचा पर्दाफाश करु असा इशाराही मृणाल पेंडसे यांनी दिला.

 621 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.