महिला दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेसचा उपक्रम
ठाणे : महिला दिनाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असून राष्ट्रवादी काँग्रेसने परिवहन आणि सफाई सेवेत काम करणाऱ्या महिलांसाठी आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी परिवहन सेवेत काम करणाऱ्या १२५ महिलांचा १ लाखांचा अपघाती विमा काढून एकप्रकारे सौरक्षण देऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांनी आपुलकी जपली आहे. महत्त्वाचे म्हणजे हे सर्व महिलांचा विमा मोफत काढण्यात आला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ठाणे परिवहन सेवेमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महिला कर्मचारी आपली कर्तव्य बजावत आहेत. आपले कर्तव्य बजावताना या महिलांना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. काम करताना भविष्यात कोणत्याही प्रकारचा अपघात झाल्यास त्यांना सुरक्षा कवच देण्याच्या उद्देशाने १२५ महिलांचा विमा काढण्यात आला आहे. तसेच पालिका क्षेत्रात काम करणाऱ्या सफाई कामगार महिलांचा देखील या विम्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.
दि न्यू इंडिया इन्शुरन्स या कंपनीच्या संयुक्त विद्यमाने या महिलांसाठी १ लाखांचा विमा काढण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक तथा गटनेते नजीब मुल्ला यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. परिवहन सभापती विलास जोशी यांच्या हस्ते विम्याचे वाटप करण्यात आले असून परिवहन सदस्य मोहसीन शेख,राष्ट्रवादी काँग्रेस युवा नेते विरु वाघमारे यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाला आयोजन करण्यात आले होते.यावेळी संदेश पाटील,दीपक पाटील,के.पी.अहद, दीपक मोरे,परवेश शेख,प्रसाद केलकेंद्रे,सिपुन बेहरा,अर्फाद मेमन आदी जण उपस्थित होते. तसेच यावेळी उपस्थित महिलांनी विमा संरक्षण मिळल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले.
638 total views, 1 views today