कोरोना काळात निर्माण झालेली रक्त टंचाई दूर करण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी मे महिन्यापासून आजतागायत एकंदर १५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये २५१० हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले.
कल्याण : ‘नर सेवा, नारायण पूजा’ अशी उदात्त भावना बाळगून निरंतर मानवसेवेच्या कार्यामध्ये योगदान देत असलेल्या संत निरंकारी मिशनच्या वतीने संत निरंकारी सत्संग भवन, साठे नगर, ऐरोली, नवी मुंबई येथे रविवारी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामध्ये ८९ युनिट रक्तदान करण्यात आले. रक्त संकलनाचे कार्य संत निरंकारी रक्तपेढी द्वारे करण्यात आले.
कोरोना काळात निर्माण झालेली रक्त टंचाई दूर करण्यासाठी नवी मुंबईसह मुंबई महानगर परिक्षेत्रामध्ये विविध ठिकाणी मे महिन्यापासून आजतागायत एकंदर १५ रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले असून त्यामध्ये २५१० हून अधिक युनिट रक्त संकलित करण्यात आले. ज्याचा उपयोग गरजू रुग्णांना होत आला आहे. संत निरंकारी मिशनच्या वर्तमान सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य मार्गदर्शनाखाली कोरोना संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशभर रक्तदान शिबिरांचे आयोजन केले जात असून या काळात मिशनमार्फत अन्य विविध लोकोपयोगी उपक्रम राबविण्यात आले आहेत.
या रक्तदान शिबिराचे उद्घाटन शिवसेना नेते तथा माजी नमुंमपा विरोधी पक्षनेते विजय चौगुले यांच्याहस्ते करण्यात आले. उद्घाटन प्रसंगी त्यांनी मिशनच्या मानवतावादी निष्काम कार्याचे कौतुक केले. या रक्तदान शिबिराला सदिच्छा भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये माजी नगरसेवक नवीन गवते, जगदीश गवते, राजेश गवते, अपर्णा गवते तसेच मनसे विभाग प्रमुख दत्ता कदम, उद्योगपती सुधीर वाडकर, समाजसेवक सर्वश्री संजय वर्धमाने आणि सोनू मिश्रा यांचा समावेश होता.
संत निरंकारी मंडळाचे स्थानिक सेक्टर संयोजक आणि स्थानिक मुखी यांच्या मार्गदर्शनाखाली संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन आणि संत निरंकारी सेवादलाच्या स्वयंसेवकांच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर यशस्वी करण्यात आले. नवी मुंबई येथील सेवादलाचे दोन क्षेत्रीय संचालक या शिबिरामध्ये उपस्थित राहिले व त्यांनी रक्तदात्यांचा उत्साह वाढविला.
594 total views, 1 views today