महिला दिनी आयुक्तांच्या दालनात भाजप नगरसेविकांचा ठिय्या

रेस्ट रुम सुरु न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा नगरसेविका आणि ठाणे शहर भाजपच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.

ठाणे : अर्बन रेस्ट रुम सुरु करण्याचे आश्वासन देऊनही ते पाळले न गेल्याने सोमवारी भाजपच्या नगरसेविकांनी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनातच ठिय्या आंदोलन केले. अखेर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले ७ रेस्टरूम लवकरच आठवडा भरात सुरु करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले असल्याची माहिती भाजपच्या महिला जिल्हा अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिली.
एकीकडे जागतिक महिला दिन साजरा होत आहे. सार्वजनिक ठिकाणी वावरतांना महिलांची कुंचबणा होऊ नये या उद्देशाने ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या विविध भागात कोटय़ावधींचा खर्च करु न १६ अर्बन रेस्ट रुम बांधण्यात आली आहेत. परंतु मागील तींन वर्षापासून यातील केवळ दोन रेस्ट रुम सुरु असून उर्वरीत रेस्ट रु म बंद आहेत. त्यामुळे ती सुरु करण्यात यावीत या मागणीसाठी दोन महिन्यापूर्वी भाजपच्या महिला मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर हे रेस्ट रुम तत्काळ सुरु करण्यात येतील असे आश्वासन पालिकेने दिले होते. परंतु त्यानंतरही ते सुरु न झाल्याने सोमवारी भाजप नगर्सेविकानी थेट महापालिका आयुक्तांच्या दालनातच रिक्षा चालक महिलांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. जोपर्यत हे रेस्ट सुरु करण्याचे आश्वासन दिले जात नाही, तो र्पयत हे आंदोलन मागे घेण्यात येणार नसल्याचा इशाराच यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. या आंदोलनात भाजपच्या ठाणे शहर महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे, नगरसेविका नम्रता कोळी, प्रतिभा मढवी, अर्चना मणेरा, नंदा पाटील, दिपा गांवड कमल चौधरी आदींसह इतर महिला पदाधिकारी आणि रिक्षा चालक महिला देखील मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या अर्बन रेस्ट रुम महापालिकेने १८ कोटींच्या आसपास खर्च केला आहे. त्यातील २ रेस्ट रुम सुरु असून उर्वरीत आजही बंद आहेत. हे रेस्ट रुम रिक्षा चालक महिलांसाठी आणि जॉबवर जाणाऱ्या महिलांसाठी सुरु करण्यात येणार होते. परंतु आज दोन वर्षे उलटूनही ते सुरु झालेले नाहीत. त्यामुळे स्मार्ट सिटीत महिलांची कुंचबणा सुरु असून ती आम्ही खपवून घेणार नसल्याचा इशारा यावेळी आंदोलनकर्त्या महिलांनी दिला. आम्हाला वॉशरुमला जाण्याची सोय नसल्याने आम्ही पाणी कमी पीत आहोत. अशी खंतही यावेळी रिक्षा चालक महिलांनी व्यक्त केली. एकीकडे स्मार्टसिटी करोडोंचा निधी खर्च केला जात आहे, कोटय़ावधींचे प्रकल्प आणले जात आहेत. परंतु महिलांना अशा प्रकारे त्रास होत असेल तर ते खपवून घेतले जाणार नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
दरम्यान यावेळी भाजपा नगर्सेविकानी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांची भेट घेऊन जोर्पयत यावर अपेक्षित उत्तर मिळत नाही, तो र्पयत हे आंदोलन मागे घेतले जाणार नसल्याचा इशाराही दिला.
आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्या दालनात आम्ही रेस्टरुमच्या मागणीसाठी ठिय्या आंदोलन केले, यावेळी आयुक्तांनी स्मार्ट सिटीचे प्रमुख गणेश देशमुख यांना बोलावून हे रेस्ट रुम केव्हा सुरु होणार याचा जाब विचारला असता, स्मार्टसिटीच्या माध्यमातून उभारण्यात आलेले उर्वरीत ७ रेस्ट रुम लवकरात लवकर म्हणजे ८ ते १० दिवसात सुरु करण्याचे आश्वासन दिले. तसेच इतर निधीतून उभारण्यात आलेले रेस्टरुम देखील लवकरच सेवेत दाखल होतील असे आश्वसन दिले आहे. या आश्वासनांतरच आंदोलन मागे घेण्यात आले आहे. परंतु रेस्ट रुम सुरु झाले नाहीन तर मात्र यापेक्षाही तीव्र आंदोलन उभे केले जाईल असा इशारा नगरसेविका आणि ठाणे शहर भाजपच्या महिला अध्यक्षा मृणाल पेंडसे यांनी दिला.

 417 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.