मधुराचे सुवर्ण ७ शतांश सेंकदाने हुकले

   २५ वी राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग,  सब ज्यूनियर गटात पूजाची सोनेरी कामगिरी
पनवेल :  राष्ट्रीय रोड रेस सायकलिंग स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महिलांच्या २० किमी अंतराच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या मधुरा वायकरचे सुवर्ण पदक अवघ्या ७ शतांश सेंकदांनी हुकले. रेल्वेच्या मेघा गुगडने ३२ मिनीटे आणि २०.४० सेंकदांची वेळ देत सुवर्ण जिंकले तर मधुराने ३२ मिनीटे २०.४७ सेंकद वेळ नोंदवत रौप्य मिळविले. महिलांच्या गटात सुवर्ण हुकले असले तरी मुलींच्या सब ज्यूनियर गटात राज्याच्या पूजा दानोळेने उत्कृष्ट वेळ देत सोन्याची किमया साधली. या गटात कांस्यही महाराष्ट्राच्याच अपूर्वा गोरेने जिंकले. या कामगिरीमुळे राज्याने पहिल्या दिवशी एका सुवर्णासह 3 रौप्य आणि एका कांस्याची कमाई केली.
पनवेल येथे सुरू असलेल्या या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी महाराष्ट्राच्या पूजाने आपली तयारी दाखवून देताना ताशी ३५.९६ कि.मी. वेगाने सायकलिंग करताना १० कि.मी. टाईम ट्रायल शर्यतीत सुवर्णपदक मिळविले. तिने १६ मिनिट ४१.०८ सेकंद वेळ दिली. याच शर्यतीत अपूर्वा गोरे हिने महाराष्ट्राला ब्रॉंझपदक मिळवून दिले. हरयाणाची रुचिका सिंग रौप्यपदकाची मानकरी ठरली. पूजाने गेल्या वर्षी झालेल्या खेलो इंडिया स्पर्धेत चार सुवर्णपदकांची कमाई केली होती.
पहिल्या दिवशी संग्राम यादव, वरद पाटिल आणि मधुरा वायकर यांनी रौप्यपदके मिळवून दिली. संग्राम पुरुषांच्या १० कि.मी. शर्यतीत रौप्यपदकाचा मानकरी ठरला. स्पर्धेतील सुवर्ण आणि ब्रॉंझपदक अनुक्रमे मोहमिस आणि परवेज या जम्मू-काश्मिरच्या सायकलपटूंनी मिळवले. मुलांच्या सब-ज्युनियर गटात २० कि.मी. अंतराच्या शर्यतीत महाराष्ट्राचा वरद पाटिल हरियानाच्या नीरज कुमारला आव्हान देऊ शकला नाही. निरजने २७ मिनिट ४७.०७ सेकंद वेळ देत सुवर्णपदकाचा मान मिळविला. त्याचा सायकलिंगचा वेग ताशी ४३.१९ कि.मी. इतका राखला होता. वरदने २८ मिनिट ३५.४२ सेकंद अशी वेळ दिली. त्याचा वेग ताशी ४१.९७ कि.मी. इतका होता. हरियानाचा गुरनूर पुनिया ब्रॉंझ पदकाचा मानकरी ठरला.
स्पर्धेचे निकाल:
पुरुष (टाईम ट्रायल ४० कि.मी.): नविन जॉन (कर्नाटक, ५३ मिनिट ३५.५३ सेकंद), मनजित सिंग (सेनादल, ५३ मिनिट ४०.९२ सेकंद), हर्षवीर सिंग सेकॉन (पंजाब, ५४ मिनिट १३.८२ सेकंद  )
महिला (टाइम ट्रायल २० किमी): मेघा गुगड ( रेल्वे, ३२ मि.२०.४० सें), मधुरा वायकर ( महाराष्ट्र, ३२ मि. २०.४७ सें), अभिरामी मनोहरन (तामिळनाडू, ३२ मि. २०.४७ सें.)
सब ज्यू. मुली (टाइम ट्रायल -१० किमी): पूजा दानोळे ( महाराष्ट्र, १६ मिनीटे ४१.०८सेंकद), रूचिका सिंग (हरयाणा,१६ मिनीट
 ४७.९८ सेकंद), अपूर्वा गोरे ( महाराष्ट्र, १६ मिनीटे ५९.६२सेंकद)
पुरूष ( टाइम ट्रायल १० किमी) : मोहमीस (जम्मू कश्मीर, १८ मिनीटे ३८.९ सेकंद), संग्राम यादव (महाराष्ट्र, १८ मि. ३९.२सेंकद), परवेज ( जम्मू कश्मीर, १८मिनीट ४०.० सेंकद)
सब ज्यू. मुले (टाइम ट्रायल २० किमी): नीरज कुमार (हरयाणा, २७ मिनीटे ४७.०७ सेंकद), वरद पाटील (महाराष्ट्र, २८मि. ३५.४२ सेंकद), गुरूनूर पूनिया ( हरयाणा, २८ मि. ३९.१९ सें.)
युवा मुली (टाईम ट्रायल, १० कि.मी.) : हर्षिता जाखड (राजस्थान, १६ मिनिट ५८.०७ सेकंद), अनुपमा गुलेड (कर्नाटक, १७ मिनिट १३.७८ सें.) धन्यदा जे.पी. (तमिळनाडू, १७ मिनिट २०.०४सें.)

 374 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.