राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाचे नेतृत्व जाधव व सोमनकडे




६ ते ८ मार्च दरम्यान पनवेल मध्ये रंगणार २५ वी राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धा

पनवेल : येथे ६ ते ८ मार्च दरम्यान होत असलेल्या २५व्या राष्ट्रीय रोड सायकलिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी ४९ सायकलपटू व संघव्यवस्थापकांचा संघ जाहीर करण्यात आला असून पुरुष गटात मुंबईचा ओंकार जाधव आणि महिला गटात संगमनेरची आंतरराष्ट्रीय पदक विजेती सायकलपटू प्रणीता सोमन या संघाचे नेतृत्व करतील. प्रताप जाधव यांच्या अध्यक्षतेखालील, संजय सातपुते, मिलींद झोडगे,  मिनाक्षी ठाकूर,  दिपाली पाटील, प्रा. संजय साठे यांच्या समितीने महाराष्ट्राचा संघ निवड केली. 
महाराष्ट्राचा संघ पुढीलप्रमाणे : महिला गट : प्रणिता सोमन (कर्णधार- संगमनेर),मधुरा वायकर (मुंबई),अंजली रानवडे (पिंपरी चिंचवड), प्रियांका कारंडे (सांगली), ऋतिका गायकवाड (नाशिक),रणजीता घोरपडे (कोल्हापूर),
महिला ज्युनिअर: निशाकुमारी यादव (सांगली), मानवी पाटील (कोल्हापूर), तन्वी तरारे (नागपूर), गायत्री लोडे (अहमदनगर), मनाली रत्नोजी (पिंपरी चिंचवड), राधिका दराडे (बारामती), 
सब ज्युनिअर गर्ल्स : अपूर्वा गोरे (अहमदनगर), पूजा दानोले, संज्ञा कोकाटे (दोघी साई-नवी दिल्ली), वैष्णवी पिल्लई (साई – गुवाहत्ती)  युथ गर्ल्स :- आकांक्षा म्हेत्रे (नागपूर),  स्नेहल माळी (नवी मुंबई – ठाणे), श्रावणी परिट (पिंपरी चिंचवड).
पुरुष गट : ओंकार जाधव (मुंबई – कर्णधार), सुधाकर देवर्डेकर (पुणे), आदर्श सक्सेना (नवी मुंबई – ठाणे), यश थोरात (ठाणे), विनीत सावंत (मुंबई), अंकुश सावळे (अहमदनगर) 
पुरुष (अंडर २३) : चिन्मय केवलरमाणी (पुणे), मिहीर जाधव (ठाणे), सुर्या थात्तू (पिंपरी चिंचवड), प्रतिक पाटील (कोल्हापूर),
पुरुष ज्युनिअर : आयुष खुराना (मुंबई), सरसश मुंड्रोईना (पुणे), सॅन्क्लेअर डिसोजा (मुंबई), निरव मेहता (पुणे), प्रथमेश हजारे (क्रीडा प्रबोधिनी पुणे) 
सब ज्युनिअर बॉईज : वरद पाटील (साई – गुवाहाटी) ओम कारंडे (अहमदनगर), वरद सुर्वे (पिंपरी चिंचवड), विरेंद्रसिंह पाटील (क्रीडा प्रबोधिनी पुणे)
युथ बॉईज : अदीप वाघ (पुणे), मल्हार नवले (नाशिक) उज्वल ठाणेकर (क्रीडा प्रबोधिनी पुणे) पुरुष भारतीय बनावटीची सायकल : संग्राम यादव (बारामती), विनय नायक (सातारा) प्रशिक्षक – दिपाली पाटील (क्रीडा प्रबोधिनी पुणे), व्यवस्थापक – भिकन अंबे (संभाजीनगर), डॉ. विजय म्हस्के (अहमदनगर) प्रशिक्षक
सब ज्युनिअर गट–   पाडुरंग भोजने (पुणे), प्राजक्ता नलावडे (अहमदनगर).

 280 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.