महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपुर आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने आयोजित करण्यात आली होती स्पर्धा
कल्याण : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन फॉर डिसेबल नागपुर आणि कोशिश फाउंडेशनच्या वतीने १८ ते २५ फेब्रुवारी दरम्यान नागपूर येथे झालेल्या राष्ट्रीय दिव्यांग टी-२० स्पर्धेत महाराष्ट्र संघाने विजेतेपद पटकावले आहे. या स्पर्धेत डोम्बिवलीतील रविंद्र संते याने १९४ धावा करत स्पर्धेत सर्वाधिक १० गडी बाद करत मालिकविराचा पुरस्कार पटकावला.
तसेच कल्याण मधील कल्पेश गायकर आपला अष्टपैलू खेळ करत ७१ धावा आणि ६ गडी बाद केले. त्यांचा या कामगिरी बद्दल सर्वच स्तरावर त्यांचे कौतुक होत असून शुभेच्छा देखील देत आहेत.
619 total views, 1 views today