सभापती,उपसभापतीसह सव्वीस सदस्यांच्या मागणीला यश
शहापूर : शहापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अशोक भवारी व सहाय्यक गटविकास अधिकारी यांच्या मनमानी कारभाराविरोधात शहापूर पंचायत समितीच्या सभापती,उपसभापती व अन्य सर्व मिळून एकूण २६ सदस्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण होते. आज(दि.२६)होणाऱ्या शहापूर पंचायत समितीच्या मासिक सभेवर या सर्वांनी बहिष्कार टाकून आमरण उपोषण करण्याबाबतचा ईशारा जिल्हापरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना लेखी पत्राद्वारे दिला होता, त्याची दखल घेत
मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी गटविकास अधिकारी अशोक भवारी यांना आजपासून सक्तीच्या रजेवर पाठविले असून त्यांच्या जागी हनुमंतराव दोडके यांना प्रभारी गटविकास अधिकारी म्हणून पदभार देण्यात आला आहे.
दोडके हे ठाणे जिल्हा परिषदेच्या ग्रामविकास विभागात सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या या नियुक्तीमुळे पंचायत समितीच्या सदस्यांनी समाधान व्यक्त केले आहे.
463 total views, 1 views today