कर्करोग दिनानिमित्त तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेण्टरच्या वतीने राबवण्यात आला उपक्रम
नवी मुंबई : ४ फेब्रुवारी रोजी जागतिक कर्करोग दिन साजरा होता व याच दिनाच्या निमित्ताने नेरुळ-नवी मुंबईतील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरतर्फे संपूर्ण महिनाभर विविध उपक्रम राबविण्यात आले होते, यावेळी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये जेष्ठ नागरिक तसेच महिलांची मोफत तपासणी करण्यात आली, तसेच नुकतीच नवी मुंबईतील ७८ रिक्षाचालकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. कोरोनाची दुसरी लाट येण्याचे संकेत मिळत असून नवी मुंबईतसुद्धा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत व येत्या काळात लॉकडाउनची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत लॉकडाउनकाळामध्ये अनेक कोरोना योध्यांनी नागरिकांनी मदत केली असून यामध्ये रिक्षाचालकांचा समावेश होता. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाल्यानंतरही सामान्य नागरिकांसाठी रेल्वे सेवा बंद असल्यामुळे रिक्षाचालकांच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे व त्यामुळे त्यांना मानसिक ताणतणावला तसेच नैराश्याला सामोरे जावे लागत आहे तसेच अनेक रिक्षा चालकांना तंबाखूचे व्यसन असते व त्यामुळे त्यांना अनेक शारीरिक व्याधींना सामोरे जावे लागते रिक्षा चालकांना आरोग्य विषयीच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेकदा व्यवसायामुळे आरोग्याकडे त्यांचे दुर्लक्ष होते. रिक्षाचालकांचे आरोग्य चांगले रहावे, यासाठी मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नेत्र तपासणी, रक्त तपासणी, मधुमेह तपासणी, दंत तपासणी तसेच आवश्यकतेनुसार त्याना आहारविषयक सल्ला देण्यात आला. रिक्षाचालकांची तंबाखूची सवय सुटावी व त्यांनी आरोग्यपूर्ण जीवन जगावे यासाठी तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टर प्रयत्नपूर्वक काम करीत असून येत्या काळात रिक्षाचालकांना कॅन्सरपासून वाचवण्यासाठी शक्य असणारी सगळी मदत त्यांना करणार आहे.
412 total views, 1 views today