ठाण्यात मराठी उद्योजकाचा मराठी भाषा दिनी स्तुत्य उपक्रम
ठाणे : कोरोना काळात नोकऱ्या गमावलेल्या तरुणांना मदतीचा हात देत मराठी भाषा दिनी मराठी उद्योजकाने ठाण्यात ‘यंग ऍण्ड ब्युटीफूल युनिसेक्स फॅमिली सलोन आणि अकादमी’ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. सलोन अकादमीच्या माध्यमातून या क्षेत्रात करिअर करू पाहणाऱ्या नवं उद्योजकांना मदतीचा हात दिला जाणार असून मराठी भाषा दिनाचे औचित्य साधत शनिवारी ठाण्यातील मल्हार सिनेमागृहाजवळ ही अकादमी आणि युनिसेक्स फॅमिली सलोन सुरु केले जाणार आहे.
कोरोना काळात लॉकडाऊन सुरु होताच विविध क्षेत्रातील तरुणांनी नोकऱ्या गमावल्या. त्यामुळे उद्योजकतेकडे ही तरुणाई वळत असतानाच त्यांना शास्त्रोक्त पद्धतीने प्रशिक्षण देत स्वतःच्या पायावर उभे करण्याचा निर्णय ग्रुप ऑफ डायनॅमिक सोल्युशन्सने घेतला असून त्यांच्या माध्यमातून ठाण्यातील मल्हार सिनेमाजवळ ‘यंग ऍण्ड ब्युटीफूल युनिसेक्स फॅमिली सलोन आणि अकादमी’ २७ फेब्रुवारी, शनिवारी मराठी भाषा दिनी सुरु करण्यात येत आहे. याठिकाणी सलोन क्षेत्रातील आधुनिक पद्धतीचे धडे नव उद्योजकांना दिले जाणार आहेत. त्यामुळे भविष्यात त्यांना उद्योजकतेच्या नव्या संधी खुल्या होणार आहेत. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री मीरा जगन्नाथ हिच्या हस्ते या अकादमीचे उदघाटन होणार असून या कार्यक्रमास ‘साजरी’ क्रिएटीव्हच्या दर्शना अयाचित, बालकलाकार साजरी अयाचित, आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे, नगरसेवक संजय वाघुले, सुनेश जोशी, नगरसेविका प्रतिभा मढवी, मृणाल पेंडसे आणि आयलिंकचे व्यवस्थापकीय संचालक मंदार जोशी, अकादमीच्या संचालिका मेधा घांग्रेकर, आध्या लवंगारे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
420 total views, 1 views today