कामगार नेते रवींद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त फळ वाटप

नेरूळमधील जीवनज्योती आशालय या आश्रमात अनाथ मुलांना फळ व शालेय साहित्याचे केले वाटप.

नवी मुंबई : कामगार नेते व नवी मुंबई इंटकचे अध्यक्ष तसेच नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे प्रवक्ते रविंद्र सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त गुरूवारी (दि. २५ फेब्रुवारी) नेरूळमधील जीवनज्योती आशालय या आश्रमात अनाथ मुलांना फळवाटप व शालेय साहित्याचे वाटप कॉंग्रेसच्या नवी मुंबई जिल्हा सचिव विद्या भांडेकर यांच्या नेतृत्वाखाली नेरूळ कॉंग्रेसकडून करण्यात आले.
नेरुळ सेक्टर १६ ए मधील जीवनज्योती आशालय या आश्रमातील अनाथ मुलांना कलर बॉक्स, ड्राईग पेपर, केळी, संत्री, चिकू, बिस्किट, केक चॉकलेट आदींचे वाटप विद्या भांडेकर यांच्या माध्यमातून करण्यात आले. या कार्यक्रमात कॉंग्रेसचे शेवंता मोरे, अर्चना भिलारे, रामचंद्र माने ,स्वप्नील सोरटे, गौरव महापुरे, स्वप्नील दरेकर, प्रशांत गर्जे, कावळजीत सोनवणे, दीपक गावडे आदी सहभागी झाले होते.

 747 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.