जागतिक अपराधी असल्याचा आरोप करत कॅटने केली पियुष गोयल यांच्याकडे केली मागणी. या मुद्द्यावर कॅटचा न्यायालयात जाण्याचा इशारा
मुंबई : एका वृत्तपत्रात प्रकाशित झालेल्या खुलाशानंतर, अँमेझॉनने देशातील ई कॉमर्स व्यवसायावर नियंत्रण मिळवण्याचे कट कारस्थान रचला असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय कायदे मोडणाऱ्या अँमेझॉनवर तातडीने बंदी आणावी अशी मागणी कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) केंद्रिय मंत्री पियुष गोयल यांच्याकडे केली असल्याची माहीती कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेअर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी दिली.
कॅटने मागील चार वर्षांपासून देशातील ई कॉमर्स कंपन्यांच्या मनमानी काराभाराविरुद्ध आंदोलन छेडले आहे. सुरेश ठक्कर म्हणाले, भारतीय कायद्यांची पायमल्ली करणे हे अँमेझॉनचे नित्याचे झाले. त्यात आता फ्लिपकार्टचाही समावेश झाला आहे. त्यामुळे फ्लिपकार्टचीही सरकारने चौकशी करून त्यांच्यावरही बंदी आणावी अशी आमची मागणी आहे. याशिवाय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी जाहीर केलेल्या एफडीआय नीती प्रेस नोट क्रमांक २ रद्द करून नवी प्रेस नोट जारी करावी. सरकारने आता ई कॉमर्स व्यापार नीती धोरणाला अंतिम रूप द्यावे.
आंतरराष्ट्रीय वृत्तपत्रात प्रकाशित झालेले खुलासे, कॅटने याआधी नोंदवलेल्या साक्षी, पुरावे अँमेझॉन आणि इतर ई कॉमर्स कंपन्यांवर कारवाई करण्यासाठी पुरेसे आहेत. यासंदर्भात न्यायालयामार्फत अँमेझॉनवर कुठली कारवाई करता येईल का याची चाचपणी कॅट करत असून, लवकरच कॅटचे विधी सल्लागार याबाबतीत निर्णय घेणार असल्याचे सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
661 total views, 1 views today