त्यांचा व्हॅलेंटाईन डे आश्रमातील मुलांसोबत

तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे येथील माहेर निव आश्रमातील ३२ मुलांसोबत व्हॅलेंटाइन दिन साजरा केला. यावेळी ४ ते १४ वयोगटातील मुलांची संपूर्ण शारीरिक तपासणी  करण्यात आली यामध्ये नाक कान घसा तपासणी, दंत  तपासणी व इतर महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या.

नवी मुंबई : प्रेमाचा उत्सव मानला जाणारा व्हॅलेंटाइन दिन काल मोठ्या उत्साहात साजरा झाला असून या दिवसाचे औचित्य साधून नेरुळ येथील तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटल व रिसर्च सेन्टरच्या कर्मचाऱ्यांनी कोपरखैरणे येथील माहेर निव आश्रमातील ३२ मुलांसोबत व्हॅलेंटाइन दिन साजरा केला. यावेळी ४ ते १४ वयोगटातील मुलांची संपूर्ण शारीरिक तपासणी  करण्यात आली यामध्ये नाक कान घसा तपासणी, दंत  तपासणी व इतर महत्वाच्या तपासण्या मोफत करण्यात आल्या तसेच  यावेळी त्यांचा आहार कसा असावा याबद्दल मार्गदर्शन केले. लहान मुलं अनेकदा योग्य पद्धतीने ब्रश करत नाहीत. त्यामुळे, त्यांच्या दातांना किड लागते. यातून, मुलांचे दात कमी वयातच काढावे लागतात. याच पार्श्वभूमीवर या मुलांना मार्गदर्शन केले. यावेळी मुलांना कॉमिक्स पुस्तके तसेच ज्ञान वाढविणारी विविध पुस्तके भेट करण्यात आली. पालकांचे छत्र हरपल्यामुळे या मुलांना  कुटुंब वात्सल्याचा आनंद मिळत नाही. नात्यामधले प्रेम, माया, जिव्हाळा काय असतो ते  कळत नाही याच भावनेतून तेरणा स्पेशालिटी हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांनी या मुलांसोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या त्यांच्यासोबत वेळ घालवून व्हॅलेंटाईन दिन साजरा केला.

 440 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.