रिक्षा चालकांना दिले प्रथमोपचाराचे धडे

रिक्षाचालकांना विविध प्रात्यक्षिकांद्वारे जखमी व्यक्तीला अथवा एखाद्या बेशुद्ध व्यक्तीला कसा प्रथमोपचार देता येईल याचे धडे दिले. या प्रशिक्षण शिबिरानंतर रिक्षा चालकांची विनामुल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात आली.

कल्याण : ३२ व्या रस्ता सुरक्षा अभियानाचे औचित्य साधून कल्याणमध्ये रिक्षा चालकांना प्रथमोपचाराचे धडे देण्यात आले. रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर आणि फोर्टिस हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने कल्याण शहरातील रिक्षा चालकांसाठी विनामुल्य आरोग्य तपासणी व बी.एल.एस प्रशिक्षण शिबिराचे आयोजन फोर्टिस हॉस्पिटल जवळ करण्यात आले होते.
रिक्षा चालवतांना रिक्षा चालकांना अनेक अपघातांना सामोरे जावे लागते. अनेक वेळा रिक्षा चालकांच्या समोर देखील अपघात घडत असतात. अशावेळी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीला वेळेत उपचार मिळणे आवश्यक असते. अपघाताचे घटना स्थळ ते त्या व्यक्तीला हॉस्पिटलमध्ये नेई पर्यंत वेळ गेल्याने अनेक वेळा अपघातग्रस्त व्यक्तीला आपल्या प्राणांना मुकावे लागते. अशावेळी जखमी व्यक्तीला प्रथमोपचार मिळणे गरजेचे असते. यासाठीच रिक्षाचालकांना डॉ. मनजीत सिंग सैनी यांनी बेसिक लाईफ सपोर्ट प्रशिक्षण दिले.
यावेळी रिक्षाचालकांना विविध प्रात्यक्षिकांद्वारे जखमी व्यक्तीला अथवा एखाद्या बेशुद्ध व्यक्तीला कसा प्रथमोपचार देता येईल याचे धडे दिले. या प्रशिक्षण शिबिरानंतर रिक्षा चालकांची विनामुल्य आरोग्य तपासणी देखील करण्यात आली. यामध्ये उंची, वजन, बॉडी मास इंडेक्स, रेंडम ब्लड शुगर, रक्तदाब, ई.सी.जी., ऑक्सिजन सॅच्युरेशन, तापमान तपासणी तसेच डोळ्यांची तपासणी करण्यात येऊन डॉक्टरांचा सल्ला देखील देण्यात आला.
यावेळी डॉ. मनजीत सिंग सैनी, उप प्रादेशिक मोटार वाहन निरीक्षक दिपक शिंदे, रिक्षा टॅक्सी चालक मालक असोसिएशन कल्याण शहर अध्यक्ष प्रकाश पेणकर, संतोष नवले, जितेंद्र पवार, विलास वैद्य, प्रणव पेणकर आदींसह रिक्षा चालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 634 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.