नेरूळ सेक्टर ६ मध्ये सीसीटीव्हीचे उत्साहात लोर्कापण

वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाम शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्हीचे महत्व उपस्थितांना अवगत करून दिले.

नवी मुंबई : समाजसेवक धीरज आहूजा यांच्या वाढदिवसानिमित्त स्माईल्स फांऊडेशन व दत्तकृपा सेवाभावी संस्था या सामाजिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांकरीता सीसीटीव्ही देण्यात आले. त्याचा लोर्कापण सोहळा नेरूळ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाम शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला,
नेरूळ सेक्टर सहा परिसरातील रहीवाशांच्या सुरक्षेकरता ४ सीसीटीव्हींच या कार्यक्रमात लोर्कापण झाले. यावेळी भाषण करताना वरिष्ठ पोलिस निरीक्षक शाम शिंदे यांनी कायदा व सुव्यवस्थेसाठी सीसीटीव्हीचे महत्व उपस्थितांना अवगत करून दिले. लाखोच्या लोकसंख्येची कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अवघ्या ११० पोलिसांचे संख्याबळ असते. अशावेळी सीसीटीव्हीच्या माध्यमातून गुन्ह्याची उकल करण्यास मदत होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी स्माईल्स फांऊडेशनच्या अध्यक्षा अध्यशा उमा आहूजा, दत्तकृप्पा सेवाभावी संस्थेचेअध्यक्ष महादेव पवार, समाजसेवक प्रल्हाद पाटील,प्रशांत सोळसकर, तेजस फणसे, यशवंत मोहीते, प्रमोद शेळके, रवी सुर्वे, रोहीदास हाडवळे, रवी पवार, निखिल हांडे यांच्यासह स्थानिक रहीवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रशांत सोळसकर यांनी केले.

 518 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.