संदीप ओंबासे क्रीडा जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित


तायक्वांदो खेळाच्या विकासासाठी दिलेल्या योगदानाबद्दल करण्यात आला गौरव

कल्याण :  वर्ल्ड बुद्धिस्ट  व आंबेडकरराईट मिशन, भारत व कल्याण तालुका जर्नालिस्ट वेलफेअर असोसिएशन यांच्यावतीने मूकनायक शताब्दी सांगता सोहळा  मुंबई पत्रकार भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात होता. या पुरस्कार सोहळ्यामध्ये राज्य तायक्वादो संघटनेचे सचिव संदीप ओंबासे यांनी या खेळाच्या विकासासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल यांना महाराष्ट्र विधानसभेचे तत्कालीन अध्यक्ष
नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते क्रीडा जीवन गौरव हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, मुंबई महानगरपालिकेच्या महापौर  किशोरी पेडणेकर, डॉ. रामप्रसाद मोरे, जेष्ठ पत्रकार प्रदीप जगताप, सेवा निवृत्त पोलिस अधिकारी साहेबराव सुरवाडे व आदी मान्यवर उपस्थित होते.
संदीप ओंबासे यांनी महाराष्ट्रात तायक्वांदो हा ऑलम्पिक क्रिडा प्रकार खोलवर रुजवण्यात खूप मोठे योगदान दिले आहे.
१९९४ ला जर्मनी (वेसेल) येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते,  भारतीय ऑलिम्पिक संघटनेतर्फे तर्फे मणीपूर (इम्फाळ) येथे झालेल्या राष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धेत त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते तसेच आतापर्यंत २२ राज्य , ८ राष्ट्रीय, व २ आंतरराष्ट्रीय स्पर्धा खेळण्याचा मान त्यांना मिळाला.
सध्या ते तायक्वांदो असोसिएशनचे ऑफ महाराष्ट्र सचिव म्हणून कार्यरत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली आतापर्यंत हजारो खेळाडू तयार झाले आहेत. या खेळाची जागतिक संघटना वर्ल्ड तायक्वांदो फेडरेशन या संघटनेच्या जागतिक सभा  २०१६ ला रशिया येते संपन्न झाली होती आणि यासाठी  भारतातुन संदीप ओंबासे यांना उपस्थित राहण्याचा मान मिळाला होता. या खेळासाठी त्यांनी दिलेल्या भरीव योगदानाबद्दल त्यांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.  संदीप ओंबासे यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार त्यांचे चिरंजीव स्वप्निल संदीप ओंबासे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

 463 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.