जळगावच्या वृषाली-साक्षी यांचा दबदबा

जेएमडीवायसी पिकलबॉल ; प्रशांत-श्रीजीत यांचे पुरुष दुहेरीत कांस्य पदक

मुंबई : जल मंगल दीप यूथ क्लब (जेएमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजन झालेल्या जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेत जळगावच्या वृषाली ठाकरे आणि साक्षी बाविसकर यांनी महिला दुहेरीचे जेतेपद पटकावले. दुसरीकडे, प्रशांत राऊळ आणि श्रीजीत नायर यांनी पुरुष दुहेरीत कांस्य पदक जिंकले.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकलबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने झालेल्या या स्पर्धेत रंगतदार लढती झाल्या. महिला दुहेरी अंतिम सामन्यात वृषाली-साक्षी यांनी सावध सुरुवातीनंतर आक्रमक पवित्रा घेत औरंगाबादच्या करिष्मा कालिके-आदिती जगताप यांना दडपणाखाली आणले. वृषाली-साक्षी यांनी सरळ दोन सेटमध्ये बाजी मारत ११-७, ११-५ अशा विजयासह जेतेपदावर कब्जा केला. यानंतर कादंबरी पाटील-भक्ती आडीवरेकर या मुंबईकर जोडीला कांस्य पदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. अत्यंत अटीतटीच्या लढतीत कोमल राजदेव – अनुराधा शिरसाट या औरंगाबादच्या जोडीने ११-१०, ११-१० अशा विजयासह कांस्य पदक पटकावले.
दुसरीकडे, पुरुष दुहेरीत यजमान मुंबईच्या प्रशांत राऊळ – श्रीजीत नायर यांनी दिमाखात कांस्य पदक पटकावत निखिल सिंग राजपूर – अर्जुन सिंग शेखावत या राजस्थानच्या कसलेल्या जोडीला नमविले. तीन सेटपर्यंत रंगलेल्या या रोमांचक सामन्यात प्रशांत-श्रीजीत यांनी ११-६, ७-११, ११-५ असा शानदार विजय मिळवला. पुरुष दुहेरीत मिहिर खंडेलवाल – प्रणव धाईपुडे आणि कश्यप बरनवाल – गौरव राणे या मुंबईकर जोड्यांनी अंतिम फेरी गाठली.
जळगावकर चमकले
स्पर्धेत मिश्र दुहेरी गटामध्ये जळगावने शानदार कामगिरी केली. जळगावच्याच खेळाडूंमध्ये झालेल्या कांस्य पदकाच्या लढतीत चमकदार खेळ झाला. यामध्ये भूपेंद्र पोळ – साक्षी बाविसकर यांनी कांस्य पटकावताना अजय चौधरी – वृषाली ठाकरे यांचा ११-८, ११-९ असा पराभव केला. या गटातून क्रिष्णा मंत्री – करिष्मा कालिके (औरंगाबाद) आणि निखिल सिंग राजपूत – शिव कंवर (राजस्थान) यांनी अंतिम फेरीत प्रवेश केला. 
स्पर्धेतील निकाल :
महिला दुहेरी गट : अंतिम सामना :
वृषाली ठाकरे – साक्षी बाविसकर (जळगाव) वि.वि. करिष्मा कालिके – आदिती जगताप (औरंगाबाद) ११-७, ११-५
तिसरे स्थान :
कादंबरी पाटील-भक्ती आडिवडेकर (मुंबई) पराभूत वि. कोमल राजदेव – अनुराधा शिरसाट (औरंगाबाद) १०-११, १०-११.
पुरुष दुहेरी : (उपांत्य लढती)
प्रशांत राऊळ – श्रीजीत नायर (मुंबई) पराभूत वि. मिहिर खंडेलवाल – प्रणव धाईपुढे (मुंबई) ९-११, ७-११.
निखिल सिंग राजपूत – अर्जुन सिंग शेखावत (राजस्थान) पराभूत वि. कश्यप बरनवाल – गौरव राणे (मुंबई). ४-११, १०-११.
तिसरे स्थान :
प्रशांत राऊळ – श्रीजीत नायर वि.वि. निखिल सिंग राजपूत वि. अर्जुन सिंग शेखावत ११-६, ७-११, ११-५.
मिश्र दुहेरी (उपांत्य लढती) :
क्रिष्णा मंत्री – करिष्मा कालिके (औरंगाबाद) वि.वि. अजय चौधरी वि. वृषाली ठाकरे (जळगाव) ११-५, ११-७.
निखिल सिंग राजपूत – शिव कंवर (राजस्थान) वि.वि. भूपेंद्र पोळ – साक्षी बाविसकर (जळगाव) ११-८, ११-८
तिसरे स्थान :
भूपेंद्र पोळ – साक्षी बाविसकर  वि.वि.  अजय चौधरी – वृषाली ठाकरे ११-८, ११-९. ११-९.

 309 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.