सामन्यात फलंदाजीत २५ चेंडूत नाबाद २९ आणि १७ धावात ४ विकेट्स मिळवणाऱ्या जांग्रवीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
ठाणे : जांग्रवी पवारच्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीने आचरेकर एकादश संघाचा ६१ धावांनी पराभव करत डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित अर्जुन मढवी स्मृती महिला टी २० क्रिकेट लीग स्पर्धेत सलग दुसरा विजय नोंदवला. सेंट्रल मैदानावर खेळल्या गेलेल्या या सामन्यात फलंदाजीत २५ चेंडूत नाबाद २९ आणि १७ धावात ४ विकेट्स मिळवणाऱ्या जांग्रवीला सामन्यातील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमीने २ फलदांजांच्या मोबदल्यात १४६ धावा केल्या. संघाला चांगली धावसंख्या उभारुन देताना जान्हवी काटेने ४३ चेंडूत ७ चौकार मारत नाबाद ५१ धावांची अर्धशतकी खेळी केली. तर मानसी पाटीलने सात चौकारांसह २४ चेंडूत ३४ धावा केल्या. त्यानंतर जांग्रवीसह झिल डिमेलो आणि जान्हवी काटेने प्रभावी मारा करत आचरेकर एकादश संघाला ८५ धावांवरच रोखले. झिल आणि जान्हवीने प्रत्येकी दोन विकेट्स मिळवल्या.
474 total views, 2 views today