गोरेगावमध्ये शुक्रवारपासून रंगणार पिकलबॉलचा थरार

देशभरातील सुमारे १६५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात येथील खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती स्पर्धा संचालक चेतन सनिल यांनी दिली.

मुंबई : कोरोनामुळे सुमारे वर्षभर क्रीडाविश्व ठप्प राहिल्यानंतर आता हळूहळू प्रत्येक खेळ पूर्वपदावर येत आहेत. सध्या भारतीयांमध्ये वेगाने लोकप्रिय होत असलेल्या पिकलबॉल खेळही कोरोनानंतर वेग पकडत असून यंदाच्या सत्रातील रोख पारितोषिक असलेली पहिली स्पर्धा मुंबईत या आठवड्यात पार पडत आहे. जल मंगल दीप यूथ क्लब (जेएमडीवायसी) आणि रोट्रॅक्ट क्लब ऑफ बॉम्बे यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदक ग्रुप – जेएमडीवायसी खुल्या पिकलबॉल स्पर्धेचा थरार ५ ते ७ फेब्रुवारीदरम्यान गोरेगाव येथे रंगणार आहे.
अखिल भारतीय पिकलबॉल संघटना (एआयपीए) आणि अमॅच्युअर पिकबॉल फेडरेशन यांच्या मान्यतेने होत असलेल्या या स्पर्धेचा थरार बांगुर नगर (गोरेगाव, प.) जल मंगल दीप सोसायटी संकुलात पार पडेल. देशभरातील सुमारे १६५ खेळाडूंनी या स्पर्धेत सहभाग घेतला असून यामध्ये महाराष्ट्रासह छत्तीसगड, राजस्थान आणि गुजरात येथील खेळाडूंनी आपला सहभाग निश्चित केला असल्याची माहिती स्पर्धा संचालक चेतन सनिल यांनी दिली.
दुहेरी गटाच्या सामन्यांचा समावेश असलेल्या या स्पर्धेत सहा गटांमध्ये चुरस रंगेल. यामध्ये पुरुष व महिला दुहेरी, मिश्र दुहेरी, ४० हून अधिक वर्षावरील पुरुष दुहेरी, १६ वर्षांखालील मुले व मुली दुहेरी अशा सहा गटांमध्ये जेतेपदासाठी चुरस रंगेल. विजेत्या खेळाडूंना रोख रक्कम, चषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येईल. त्याचप्रमाणे, अमॅच्युअर पिकबॉल फेडरेशनचे नवनिर्वाचित अध्यक्ष अरविंद प्रभू यांनी स्पर्धेत दोन सुवर्ण पदक पटकावून ‘मोस्ट व्हॅल्युएबल प्लेअर’ ठरणाऱ्या खेळाडूसाठी विशेष पारितोषिक जाहीर केले असून हा पुरस्कार पटकावणाऱ्या खेळाडूस २५ हजार रुपये आणि फॅमिली हॉलिडे पॅकेज बक्षीस म्हणून जाहीर केले आहे

 446 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.