रस्ते सुरक्षा विषयक त्रुटी दुर करा

ठाणे काँग्रेस ओबीसी विभागाची मागणी
ठाणे : कोपरी वळण रास्ता या ठिकाणी सुरक्षा विषयक उपाय योजना मध्ये असलेल्या त्रुटी मुळे वारंवार या ठिकाणी अपघात होत आहेत याबाबत वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. याठिकाणी होत असलेले अपघात व एक जीवितहानी झाल्याने मागील वर्ष भरा पासून पाठपुरावा करत आहे. परंतु या आधीचे उपायुक्त अमित काळे यांच्या निदर्शनास आणून देखील कुठल्याही प्रकारच्या उपाय योजना न केल्याने अपघातांच्या मालिका चालूच आहेत हे देखील यावेळी निदर्शनास आणून दिले.यावेळी वाहतूक उपयुक्तांनी सकारात्मक चर्चा करून तातडीने उपाय योजना करण्याचे आश्वासन दिले . वाहतूक सप्ताहाच्या अनुषंगाने संपूर्ण ठाणे शहरात चालू असलेल्या विकास कामांच्या ठिकाणी जसे FOB,ROB, Metro, महामार्गावर चालू असलेली कामे,महानगरपालिका हद्दीत रस्त्यावर चालू असलेली कामे या सर्वच ठिकाणी सुरक्षा विषयक उपाय योजना केलेल्या आहेत की नाही याची पाहणी करून आवश्यक ठिकाणी ब्लिकिंग लाईट ,लाईट रिफ्लेक्टर, इलेक्ट्रिकल दिशादर्शक, वळण रस्ता बोर्ड, व इतर उपाय योजना केल्यास भविष्यात घडणारा अपघात अथवा एखादी जीवित हानी नक्कीच टळेल अशी मागणी यावेळी करण्यात आली. या प्रसंगी प्रदेश पदाधिकारी जे. बी.यादव, माजी नगरसेवक संजय घाडीगांवकर, माजी नगरसेवक शैलेश शिंदे,माजी परिवहन सदस्य सचिन शिंदे, युवक काँग्रेस चे योद्धन शिंदे,सागर लबडे,दिलीप भोईर,सखाराम पाटील,संदीप यादव आदी पदाधिकारी उपस्थित होते

 402 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.