कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर सादर करण्यात आलेल्या आर्थसंकल्पावर कॅटची प्रतिक्रिया
मुंबई : कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत सादर केलेला अर्थसंकल्प देशाच्या सर्वांगिण विकासाला चालना देणारा आहे. या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या अनेक तरतुदी व्यापाऱ्यांना व्यवसाय करणासाठी प्रोत्साहित करणाऱ्या असल्याचे मत कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी व्यक्त केले.
सुरेशभाई ठक्कर म्हणाले, देशातील जेष्ठ नागरिकांना करसवलत देणे, आरोग्यासंबंधित सेवा आणखी भक्कम करणे हे यंदाच्या अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य आहे. यंदाच्या अर्थसंकल्पात देशातील नागरिकांवर कुठलाही नवीन कर लावण्यात आलेला नाही. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे महत्व आणखी वाढले आहे.
गेले पंधरादिवस नवे कर लागू होण्याबद्दल चर्चा होती. या चर्चेला आता पूर्ण लगाम बसला आहे.
आज अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री म्हणाल्या, वस्तूसेवा कर प्रक्रिया आता साधी सरळ आहे. पण प्रत्यक्षात ही कर प्रणाली किचकट आणि गुंतागुंतिची ठरली आहे. सुरेशभाई ठक्कर म्हणाले, मोदी सरकारच्या दूरगामी योजनांचे आम्ही स्वागत करतो.पण या योजनांची अंमलबजावणी प्रक्रिया व्यापाऱ्यांसाठी कटकटीची ठरली आहे.वस्तू सेवा कराची सद्यस्थिती या कराच्या मूळ उद्देशालाच बगल देत आहे. साधी सरळ अशी वस्तू सेवा करप्रणाली आता व्यापाऱ्यांसाठी अप्रिय आणि . डोईजड ठरली आहे.
वस्तू सेवा कराची पूर्तता करणे व्यापाऱ्यांसाठी कठीण झाले आहे. चारवर्ष जुन्या असलेल्या या कर प्रणालीतील सुमारे ४०० नियमांची समीक्षा करणार असल्याचे सीतारामन म्हणाल्या होत्या. पण तरीसुद्धा वस्तू सेवा कर पद्धतीत बदल करण्यात आलेले नाहीत. कोरोना महामारीमुळे आधीच विस्कळित झालेला व्यवसाय सावरताना व्यापाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. याशिवाय भारतातील घाऊक बाजाराला प्रोत्साहन मिळेल अशी एकही घोषणा करण्यात आलेली नाही. सुमारे ८०लाख कोटीहून अधिक रकमेचा रिटेल व्यवसाय चालतो, त्यातून सुमारे ४० कोटी लोकांना रोजगार मिळतो. ही बाब आम्ही अर्थमंत्री आणि पंतप्रधानांच्या लक्षात आणून देणार आहोत.कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर याहून अधिक चांगला अर्थसंकल्प मांडता आला नसता. त्यामुळे कॅटचे सर्व पदाधिकारी आणि सदस्य अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो आहोत असे सुरेशभाई ठक्कर म्हणाले. कॅट ही देशातील रिटेल व्यापाऱ्यांची शिखर संघटना असून सुमारे ८.५ कोटीहून व्यापारी या प्रति निधी त्व करत आहे।
539 total views, 2 views today