आश्रमशाळा कर्मचार्‍यांचे वेतन अनुदान मंजुर

स्वराज्य शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला यश 

कल्याण : राज्यातील (भटक्या व विमुक्त जमाती) आश्रमशाळा कर्मचार्‍यांच्या वेतनासाठी १४४ कोटी रुपये वेतन अनुदान मंजुर झाले आहे. राज्यातील आश्रमशाळा कर्मचार्‍यांच्या विविध प्रलंबीत प्रश्नां बाबत इतर मागास व बहुजन कल्याण विभागाचे मंत्री  विजय वडेट्टीवार यांच्या कार्यालयात स्वराज शिक्षक संघासोबत बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत स्वराज शिक्षक संघाच्या वतीने आश्रमशाळा कर्मचार्‍याचे प्रश्न मांडण्यात आले. त्याची दखल घेत हे अनुदान तत्काळ मंजुर केले.
या बैठकित कर्मचार्‍यांच्या वैयक्तीक लाभामध्ये येत असलेले अडथळे, काही पदांच्या वेतनश्रेणीतील विसंगती, प्राथमिक व माध्यमीक विभागाला स्वतंत्र अधिक्षक, कनिष्ठ महाविद्यालयांना प्राथमिक व माध्यमिक विभागा प्रमाणे इमारत भाडे मंजुर करणे, प्राथमिक विभागास वेतनेत्तर ८% अनुदान मंजुर करणे, चालु आर्थीक वर्षात विद्यार्थी उपस्थीतीनुसार परिपोषण अनुदान मंजुर करणे,  या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. अनुदान उपलब्ध असुनही आश्रमशाळा कर्मचार्‍यांचे वेतन वेळेवर न करणार्‍यां अधिकार्‍यांवर कडक कारवाई करण्या बाबतचा सज्जड दम मंत्री विजय वडेट्टीवारांनी दिला.
या बैठकीस मंत्री विजय वडेट्टीवार, शिक्षक आमदार विक्रम काळे, शिक्षक आमदार इंद्रनील नाईक, बहुजन कल्याण विभागाचे प्रधान सचीव जे.पी.गुप्ता, स्वराज शिक्षक संघाचे प्रदेशाध्यक्ष फत्तेसिंह पवार, ठाणे जिल्हा अध्यक्ष रणधिर शिंदे व संघाचे पदाधिकारी उपस्थीत होते.

 343 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.