ठाण्यात प्रथमच रंगणार अर्जुन मढवी स्मृती महिला लीग क्रिकेट स्पर्धा

ठाणे , मुंबई परिसरातील आठ आघाडीच्या संघांचा समावेश असलेली हि स्पर्धा सेंट्रल मैदानावर २ ते १२ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येईल.

ठाणे : डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशनतर्फे ठाण्यात प्रथमच अर्जुन मढवी स्मृती महिला ट्वेन्टी २० लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणे , मुंबई परिसरातील आठ आघाडीच्या संघांचा समावेश असलेली हि स्पर्धा सेंट्रल मैदानावर २ ते १२ फेब्रुवारी दरम्यान खेळवण्यात येईल. स्पर्धेतील सहभागी संघांना मोफत प्रवेश देण्यात आला असून त्यात डॉ राजेश मढवी स्पोर्ट्स असोसिएशन, स्पोर्टिंग कोल्ट्स, आचरेकर एकादश, पालघर डहाणू तालुका स्पोर्ट्स असोसिएशन, निगेव्ह स्पोर्ट्स, दहिसर स्पोर्ट्स, अजीत घोष एकादश, गोल्डन स्टार क्रिकेट अकॅडमी या संघाचा समावेश आहे. या स्पर्धेच्या निमित्ताने ठाणेकरांना भारतीय अ संघातून खेळलेली वृषाली भगत, मंजिरी गावडे, रेश्मा नाईक, साइमा ठाकोर, प्रकाशिका नाईक, भारतीय संघातील महिला यष्टीरक्षकांच्या विशेष सराव शिबिराकरता निवड झालेली हेमाली बोरवणकर, हुमेरा काझी, जान्हवी काटे या मुंबईतील प्रमुख महिला क्रिकेटपटूंचा खेळ जवळून बघता येणार आहे. स्पर्धेतील विजेता, उपविजेता संघ, सामन्यातील सर्वोत्तम क्रिकेटपटू, सर्वोत्तम गोलंदाज, फलंदाजास आकर्षक पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. स्पर्धेच्या पारितोषिक वितरण समारंभास वरिष्ठ भारतीय महिला क्रिकेट संघाच्या निवड समिती सदस्या आरती वैद्य, माजी निवड समिती सदस्या अंजली पेंढारकर उपस्थित राहणार असल्याचे स्पर्धेचे प्रमुख संयोजक डॉ राजेश मढवी यांनी सांगितले.

 362 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.