लिंग-निरपेक्ष जग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या ब्रँड्सचा सन्मान करण्यासाठी फेमिना इंडियातर्फे हा पुरस्कार दिला जातो.
मुंबई : व्यक्तिगत स्वच्छतेच्या उत्पादनांचा भारतातील आघाडीचा आयुर्वेदिक ब्रँड मेडिमिक्स या चोलाईल प्रायव्हेट लिमिटेडच्या ब्रँडला ‘फेमिना पॉवर ब्रँड्स २०२०’ पैकी एक म्हणून गौरवण्यात आले आहे. लिंग-निरपेक्ष जग निर्माण व्हावे यासाठी प्रयत्नशील असलेल्या ब्रँड्सचा सन्मान करण्यासाठी फेमिना इंडियातर्फे हा पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार म्हणजे आजच्या वाढत्या आधुनिक आणि कॉस्मोपॉलिटन मनोवृत्तीतून केल्या जात असलेल्या निवडीचे एक उदाहरण तर आहेच शिवाय लिंग-निरपेक्ष जगाच्या दिशेने केले जाणारे प्रयत्न देखील दर्शवतो. असे जग ज्यामध्ये महिलांचे सबलीकरण आणि समानता हे मुद्दे अनेक संभाषणांमध्ये सर्वाधिक आघाडीवर आहेत.
चोलाईल प्रायव्हेट लिमिटेडचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक प्रदीप चोलाईल यांनी सांगितले, ‘पॉवर ब्रँड ऑफ २०२० म्हणून फेमिनाकडून मेडिमिक्सची निवड केली जाणे हा आमच्यासाठी अतिशय अभिमानाचा क्षण आहे. पन्नासावा वर्धापनदिन साजरा केल्यानंतर लगेचच हा पुरस्कार मिळाल्यामुळे आमचा आनंद आणि अभिमान अनेक पटींनी वाढला आहे. मेडिमिक्स ब्रॅंडने नेहमीच गुणवत्तेला सर्वाधिक महत्त्व दिले आहे. आजच्या आधुनिक आणि महत्त्वाकांक्षी महिलांसोबत या ब्रँडचे घनिष्ठ नाते या पुरस्कारातून दर्शवले जाते. प्राचीन काळापासून सिद्ध होत आलेली परंपरा आणि आधुनिक विज्ञान यांची सांगड असलेल्या आधुनिक आयुर्वेदावर लक्ष केंद्रीत करून सातत्याने उत्क्रांत होत असलेला आमचा ब्रँड आहे जो आजच्या युवकांना खऱ्या अर्थाने ज्यांची गरज आहे अशी उत्पादने मिळवून देतो.’
मेडिमिक्सने नेहमीच एक महिला केंद्रित ब्रँड म्हणून आपली ओळख जपली आहे, महिलांच्या नेमक्या गरजा ओळखून त्या पूर्ण करण्याच्या दृष्टीने दर्जेदार उत्पादने तयार केली आहेत. सध्याच्या काळात आयुर्वेदाला लक्षणीय लोकप्रियता प्राप्त होत आहे ही बाब अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळे सर्व विभागांमध्ये सुरक्षित आणि नैसर्गिक उत्पादने उपलब्ध होणे ही काळाची गरज बनली आहे. मेडिमिक्सने नैसर्गिक पदार्थांपासून बनवलेली आणि त्वचेसाठी सुरक्षित असलेली, अतिशय दर्जेदार उत्पादने सादर करून कॉस्मोपॉलिटन मनोवृत्ती असलेल्या महिलांची मने जिंकली आहेत.
405 total views, 2 views today