सम्राट अशोक विद्यालयात ९६ वर्षाच्या वृत्तपत्र विक्रेत्या आजीबाईंनी केले ध्वजारोहण
कल्याण: पाली भाषा प्रचार आणि प्रसार ट्रस्ट संचालित सम्राट अशोक विद्यालयात प्राथमिक माध्यमिक सम्राट अशोक इंग्लिश स्कूल व वाय सी इंग्लिश स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ७२ वा प्रजासत्ताक दिन कार्यक्रम साजरा झाला. कार्यक्रमाप्रसंगी गेल्या ७० वर्षांपासून वृत्तपत्र व कॅलेंडर विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या कल्याण च्या आजीबाई उषा पांडुरंग केतकर प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. आपल्या भाषणात आजीबाई म्हणाल्या शिक्षणाचे महत्त्व फार आहे. मुलांनी अभ्यास करून शिक्षण घ्यावं आज तिरंगा झेंडा फडकवून जीवन साक्षर झालं. मला खूप आनंद झाला.विशेष म्हणजे आजीबाईंनी कार्यक्रमाला सुद्धा कॅलेंडर विकण्यासआणलेले होते आणि शिक्षकांनी कॅलेंडर विकत घेतले. शाळेतील एम सी सी च्या विद्यार्थ्यांनी कवायत संचलन करून तिरंगी ध्वजास सलामी दिली. प्रियंका जाधव या विद्यार्थिनीने भारतीय संविधानाचे प्रास्ताविक वाचन केले. शिक्षकांनी वेळेवर सात हजार सातशे रुपये जमा करून उषाबाई केतकर यांना आर्थिक मदत केली. संस्थेचे अध्यक्ष पी. टी. धनविजय मुख्याध्यापक गुलाबराव पाटील, सुजाता नलावडे, संतोष जाधव, पंकज दुबे यांच्यासह शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थी व पालक कार्यक्रमाला ऑनलाइन उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश पाटील यांनी केले तर संतोष कदम यांनी आभार व्यक्त केलेत.
755 total views, 1 views today