जिल्हा परिषद अध्यक्षा सुषमा लोणे यांनी केले ध्वजारोहण
ठाणे : भारतीय प्रजासत्ताकाच्या ७१ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे जिल्हा परिषदेच्या प्रांगणात जिल्हा परिषद अध्यक्ष सुषमा लोणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपाध्यक्ष सुभाष पवार, महिला व बाल कल्याण समिती सभापती रत्नप्रभा तारमळे, समाजकल्याण समिती सभापती नंदा उघडा, जिल्हा परिषद सदस्य रेखा कंठे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. रुपाली सातपुते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी ( सामान्य प्रशासन ) अजिंक्य पवार, तसेच विविध विभागाचे खातेप्रमुख तसेच अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.
या कार्यक्रमावेळी कोव्हीड काळात सेवा बजावताना मयत झालेले कोविड योध्दा अरुण कृष्णा शिरोसे, ( शिपाई, सामान्य प्रशासन विभाग ) यांच्या वारसांना शासनाने मंजूर केलेला ५० लाखांचा (विमा कवच) धनादेश शिरोसे यांच्या पत्नीकडे सुपूर्त करण्यात आला.
410 total views, 1 views today