नवी मुंबईतील नाका कामगारांना सुविधा द्या


शिवसेनेनी केली पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडे केली मागणी

नवी मुंबई : नवी मुंबईतील नाका कामगारांना सुविधा देण्याची मागणी शिवसेना उपनेते, मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती आणि पर्यावरण समाघात प्राधिकरणाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विजय नाहटा यांनी नवी मुंबई महानगर पालिका आयुक्त.अभिजित बांगर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनात नाका कामगारांना नाक्यावर निवारा शेड बांधून देण्यात यावे. नाक्यावर स्वच्छता गृह बांधून देण्यात यावेत, पिण्याच्या पाण्याची सोय करून देण्यात यावी. कामगार कार्यालयात नाका कामगारांची नोंदणी करून घेण्यासाठी नवी मुंबई महानगर पालिका विभाग अधिकाऱ्याने नाका कामगार असल्याचे शिफारस प्रमाणपत्र द्यावे आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.हे निवेदन विजय नाहटा यांच्यावतीने शिवसेना उपशहर प्रमुख ( कामगार विभाग) कामगार नेते प्रदिप वाघमारे यांनी आयुक्तांना दिले असून नाका कामगारांच्या समस्या बाबत चर्चा केली. नाका कामगारांच्या समस्याबाबत शिवसेना उपनेते विजय नाहटा यांनी आयुक्तांशी चर्चा केली असून आयुक्तानी नाका कामगारांच्या मागण्या संदर्भात परिमंडळ १ आणि परिमंडळ २ उपयुक्तांना सूचना दिल्या आहेत

 292 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.