नगरसेविका अलका केळकर यांनी केले भूमिपूजन, येत्या १५ दिवसांत काम होणार पूर्ण
मुंबई : बृहन्मुंबई महानगर पालिका एच वॉर्डच्या नगरसेविका अलका केळकर यांच्या हस्ते शनिवार, २३ जानेवारी रोजी प्रेम प्रकाश मंदिर चौकाचे भूमीपूजन करण्यात आले.
आचार्य १००८ सद्गुरू तेओराम जी महाराज यांचे प्रेम प्रकाश मंदिर हे जगातील प्रमुख सिंधी देवालयांपैकी एक आहे. सीडी मार्ग आणि खार पश्चिम १७ वा रस्ता जिथे एकत्र मिळतात तिथे ही वास्तू उभारण्यात आली आहे.
प्रेम प्रकाश पंथाचे मुख्यालय जयपूर येथे असून आध्यात्मिक आणि समाजहिताची कार्ये या माध्यमातून सुरू असतात. मंदिरात नियमितपणे साई तेओराम यांच्या प्रार्थना चालतात तसेच दुर्बल घटकांतील लोकांसाठी अन्नछत्राची सोय आहे.
प्रेम प्रकाश मंदिर चौकाच्या निर्मितीचे कार्य नगरसेविका अलका केळकर यांच्या अथक आणि अविरत प्रयत्नांमुळे शक्य झाले.
आगामी काळात अंदाजे पंधरा दिवसांत या चौकाचे उदघाटन प्रेम प्रकाश पंथाचे सर्वेसर्वा स्वामी भगत प्रकाश जी महाराज यांच्या हस्ते वांद्र्याचे आमदार आशिष शेलार आणि नगरसेविका अलका केळकर यांच्या उपस्थितीत संपन्न होईल.
402 total views, 1 views today