राज्यातल्या ८ पैकी ठाणे मंडळात सर्वाधिक अॅक्टीव्ह रूग्ण संख्या

राज्यात २ हजार ७५२ नवे बाधित, १ हजार ७४३ बरे झाले तर ४५ मृतकांची नोंद

मुंबई : राज्यातील मुंबई-ठाणे, नाशिक, पुणे, कोल्हापूर, लातूर, औरंगाबाद, अकोला, नागपूर या ८ मंडळात सर्वाधिक एकूण रूग्ण मुंबईचा समावेश असलेल्या ठाणे मंडळात आहेत. त्यानंतर पुणे आणि नाशिक, नागपूर मंडळात आहेत. त्यानंतर या चार मंडळाच्या तुलनेत इतर मंडळात संख्या कमी आहे. अॅक्टीव्ह रूग्णाच्या संख्येतही ठाणे मंडळात सर्वाधिक १९ हजार रूग्ण रूग्ण असून सर्वात कमी रूग्ण अर्थात १५६५ अकोला मंडळात आहेत.
आज १,७४३ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १९,१२,२६४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९५.१८% एवढे झाले आहे. आज राज्यात २,७५२ नवीन रुग्णांचे निदान. राज्यात आज ४५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.५३% एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,४२,०७,५९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २०,०९,१०६ (१४.१४ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे राज्यात राज्यात आज रोजी एकूण ४४,८३१ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. सध्या राज्यात २,०८,९९३ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,३०९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

 371 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.