सोमवारी कॅटची मुंबई विभागीय बैठक

व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांवर होणार बैठकीत चर्चा

मुंबई : कॉनफेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सच्या (कॅट) मुंबई विभागीय बैठक सोमवार २५ जानेवारीला होणार आहे. फेडरेशन ऑफ रिटेल क्लॉथ डिलर्स असोसिएशनच्या सभागृहात संध्याकाळी ६.३० होणाऱ्या सभागृहात मुंबईतील विविध व्यापारी संघटनांचे पदाधिकारी वस्तू सेवा कर, एफएसएसआयच्या नियमांमुळे व्यापाऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांविषयी कॅटचे राष्ट्रीय   सरचिटणीस प्रविण खंडेलवाल आणि मुंबईतील विविध संघटनांचे पदाधिकारी मार्गदर्शन करणार आहेत. सरकराच्या जाचक अटी
विरोधात भविष्यातील रणनीती निश्चित करण्यासंदर्भात विशेषतः: जीएसटी, वजन आणि मेझर आणि एफएसएसआय निर्णय घेतले जाणार  आहेत असे कॅटचे महाराष्ट्र उपाध्यक्ष आणि ठाणे जिल्हा होलसेल व्यापारी वेल्फेयर महासंघाचे अध्यक्ष सुरेशभाई ठक्कर यांनी सांगितले.
याशिवाय या बैठकीत येत्या काळात व्यापाऱ्यांना आधुनिक व्यापार पद्धतींविषयी आणि त्यांच्या ई-इंडिया मार्केट ऑनलाइन पोर्टलची माहिती कॅटतर्फे माहिती करून दिली जाणार असल्याचे सुरेशभाई ठक्कर म्हणाले.
सभागृहाचा पत्ता
फेडरेशन ऑफ रिटेल क्लॉथ डिलर्स असोसिएशन, चितलिया हॉल, ६ वा मजला, फेडरेशन हाऊस, मेट्रो सिनेमाजवळ, मरीन लाईन, मुंबई ४००००२.

 423 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.