यावेळी १० वारसांना १ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप अध्यक्ष व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
कल्याण : महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी वर्कर्स फेडरेशनच्या अधिपत्याखालील “कल्याण निधी ट्रस्ट कार्यरत असुन यामाध्यमातून मयत वारसांना धनादेशाचे वाटप नुकतेच करण्यात आले. या ट्रस्टचे ८,३७५ सभासद आहेत. ट्रस्टच्या विविध पतंसस्था मध्ये १ कोटी ४५ लाख एवढया ठेवी असुन ठेवीच्या व्याजातुन सभासदाना मदत करण्यात येते. जर कर्मचारी अपघात होवुन मुत्यु झाला तर ३५ हजार तर बिना अपघात मुत्यु झाला तर ५ हजार रुपये मदत देण्यात येते.
मयत वारसांना धनादेश वाटप कार्यक्रम कल्याण पतंसस्था कार्यालय येथे सघंटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली तर सरचिटणिस कृष्णा भोयर, अतिरिक्त सरचिटणिस महेश जोतराव, उपसरचिटणीस सल्लाउदिन नाकाडे,अरुण मस्के, भिमाशकंर पोहेकर, दत्ता देशमुख विचारमंच प्रमुख मा.वी. जोगळेकर, सल्लागार टि.सी. भोईर यांच्या प्रमुख उपस्थित आयोजित करण्यात आला होता.
कल्याण येथे झालेल्या कार्यक्रमात कल्याण निधी विश्वस्त जे.आर.पाटील यांनी प्रास्तविक करताना ट्रस्टबदल विस्तृत माहिती दिली. कार्यक्रमात तानेबाई संभा कातकर, वैशाली श्रीरामकृष्ण आव्हाड, संगिता शिवाजी गावीत, खाजाबी नजीर शेख, धंनजय रमेश भोईर, प्रतिभा विलास गागुर्डे, संगिता चद्रंकांत पावशे, नंदिनी नंदकुमार पाताडे, लिना अविनाश पाटोळे, भांरती भोईर या १० वारसांना १ लाख ७० हजार रुपयांच्या धनादेशाचे वाटप अध्यक्ष व इतर प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी उपस्थित वारस व सघंटनेचे पदाधिकारी यांना मा.वि.जोगळेकर यांनी विस्तृत मार्गदर्शन केले व तरुण कामगार यांनी ट्रस्टचे सभासद व्हावे असे आव्हान केले. सघंटनेचे अध्यक्ष मोहन शर्मा यांनी ट्रस्टची स्थापन का करण्यात आली याबाबत माहिती देऊन ट्रस्टला अधिक मजबूत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोदंणी करावी व ट्रस्टचे म्हत्व सभासद याना पटवुन दयावे असे आव्हान केले.
460 total views, 1 views today