बाळासाहेबांच्या जयंतीदिनी एक हजार बेरोजगारांना मिळाला रोजगार

महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता रोजगार मेळावा  
कल्याण : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना कल्याण जिल्हा महिला संघटक विजया पोटे यांच्यावतीने आयोजित केलेल्या रोजगार मेळाव्यात सुमारे एक हजार बेरोजगारांना रोजगार मिळाला आहे.
शिवसेना बेतूरकर पाडा विभाग – प्रभाग क्रमांक २२,२३ आणि २७ च्या वतीने कल्याण पश्चिमेतील बेतुकरपाडा येथे भव्य  रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. कोरोना काळात अनेक तरूण-तरुणींच्या नोकऱ्या गेल्या अशा परिस्थिती या रोजगारांना रोजगार मिळावा यासाठी शिवसेना प्रमुखांच्या शिकवणीनुसार  ८० टक्के समाजकारण व  २० टक्के राजकारण याच प्रेरणेंने बाळासाहेबांच्या जयंती निमित्त या रोजगार मेळाव्याचे आयोजन केले होते. या रोजगार मेळाव्यात विविध २० पेक्षा अधिक कपन्यांनी सहभाग घेतला होता. या मेळाव्यातून एक हजार हून अधिक तरुण तरुणींना रोजगार प्राप्त झाला. यावेळी ज्यांची नियुक्ती झाली त्यांना कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले असल्याची माहिती महिला जिल्हा संघटक विजया पोटे यांनी दिली.
आजचा हा दिवस शिवसैनिकांसाठी स्फूर्तीचा दिवस असून बाळासाहेबांनी संपूर्ण जगात हिंदुत्त्वाच्या जागर केला. सद्ध्या नोकऱ्यांचा विषय गहन असून कोरोना काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या त्यामुळे शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेला हा रोजगार मेळावा या बेरोजगारांसाठी खूप मोठा आधार ठरणार असल्याचे मत आमदार विश्वनाथ भोईर यांनी व्यक्त केले.
यावेळी आमदार विश्वनाथ भोईर, महिला जिल्हा संघटक विजया पोटे, नगरसेविका प्रियंका भोईर, छाया वाघमारे, नगरसेवक जयवंत भोईर, माजी नगरसेवक अरविंद पोटे, सुनील वायले, विद्याधर भोईर, जयवंत भोईर, शाखा प्रमुख संतोष भोईर आदी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 384 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.