कोरोना संकटामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई भरुन काढण्याच्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीचे औचित्य साधून युनियन बँकेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आले होते शिबीर
कल्याण : संत निरंकारी मिशन अंतर्गत संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशन आणि युनियन बैंक ऑफ इंडिया स्थानीय लोकाधिकार समिति यांच्या संयुक्त विद्यमाने युनियन बँक भवन, नरीमन पॉईंट येथे शुक्रवारी एक भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले ज्यामध्ये संत निरंकारी मिशनचे सेवादार आणि युनियन बँकेचे कर्मचारी यांनी मोठ्या उत्साहाने भाग घेऊन २४१ युनिट रक्तदान केले. जसलोक हॉस्पिटलच्या रक्तपेढीने रक्त संकलन केले.
कोरोना संकटामुळे निर्माण झालेली रक्तटंचाई भरुन काढण्याच्या उद्देशाने बाळासाहेब ठाकरे यांच्या ९४व्या जयंतीचे औचित्य साधून युनियन बँकेच्या स्थानीय लोकाधिकार समितीच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरामध्ये बँक व्यवस्थापन, स्थानिय लोकाधिकार समितीचे कार्यकर्ते आणि संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे सेवादार यांनी एकजूटीने समाज सेवेसाठी पुढे येण्याची प्रेरणा दिली गेली.
या शिबिराचे उद्घाटन युनियन बैंकेचे व्यवस्थापकीय संचालक राजकिरण राय यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन करुन करण्यात आले. या प्रसंगी युनियन बँकेच्या स्थानिय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष राजेश मतकरी, संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनचे शशी परब, आंतरराष्ट्रीय कबड्डी पटू श्रीनिवास रेड्डी उपस्थित होते. शिबिराला भेट देणाऱ्या मान्यवरांमध्ये खासदार (राज्यसभा) अनिल देसाई, माजी आमदार सचिन अहिर, युनियन बँकेचे कार्यकारी संचालक गोपाल सिंग गुसेन आणि बिरुप्रकाश मिश्रा आदिंचा समावेश होता. सर्व मान्यवरांनी संत निरंकारी मिशनच्या मानवतेच्या प्रति निष्काम सेवांची प्रशंसा केली.
शिबिरातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशनला बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकांमार्फत गौरव पत्र प्रदान करण्यात आले.
702 total views, 2 views today