बेल घेणार नाही जेलमध्ये जाणार

वाढीव वीजबिले आणि  सक्तीच्या वसुली विरोधात भाजपा रस्त्यावर उतरणार

नवी मुंबई : महाविकास आघाडी सरकारने लादलेल्या वाढीव वीज बिले आणि जबरदस्तीच्या विज बिल वसुलीविरोधात नवी मुंबई भाजपाने रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलनाचा इशारा दिला असून यापूर्वीच्या आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत हे कार्यकर्ते जामीन न घेता जनतेसाठी प्रसंगी तुरुंगात जाण्याची तयारी ठेवून आहेत अशी माहिती शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. शुक्रवारी भाजपाच्या वतीने नवी मुंबईतील सर्व नोड मध्ये पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि नागरिकांनी सत्तामाजुरी महा विकास आघाडी सरकारचा वीज दरवाढ आणि आणि बळपूर्वक वीज बिल थकबाकी वसूल करण्याच्या निर्णयाचा जोरदार निषेध केला.
थकबाकीदार ग्राहकांच्या वीज जोडण्या तोडण्याचे तुघलकी फर्मान राज्य सरकारने काढले आहे त्याचा जळजळीत निषेध पत्रकार परिषदेत करण्यात आला भाजपाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र घरत माजी महापौर जयवंत सुतार माजी महापौर सागर नाईक माजी महापौर सुधाकर सोनावणे माजी सभागृहनेते रवींद्र इथापे माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत जेष्ठ नगरसेवक अनंत सुतार माजी नगरसेविका नेत्रा शिर्के माजी नगरसेविका शुभांगी पाटील भाजपा पदाधिकारी सतीश निकम आदी मान्यवर पत्रकार परिषदेला उपस्थित होते
एकीकडे जाचक विज बिल देऊन महा विकास आघाडी सरकारने जनतेला वेठीस धरले आहे आता दंडेलशाहीने विज बिल वसूल करणार आहेत भारतीय जनता पक्ष या दंडेलशाही चा विरोध करणार असून वाढीव वीज बिल रद्द करावीत आणि सक्तीने विज बिल वसूल करण्याचा निर्णय मागे घ्यावा अशी मागणी रामचंद्र घरत यांनी केली
कोरोनाच्या संकटसमयी भाजपाच्या वतीने सर्वत्र मदतीचा ओघ सुरू असताना दुसरीकडे महा विकास आघाडी सरकारने मात्र वीज दरवाढ करून मोठा गुन्हा केल्याची टीका नेत्रा शिर्के यांनी यावेळी केली. केवळ सर्वसामान्य नागरिकच नव्हे तर  व्यावसायिकांकडून भरमसाठ बिले वसूल करून लूट केली. ३०० युनिटपर्यंत विज बिल माफ करण्याचे आश्वासन आघाडी सरकारने दिले होते हे आश्वासन खोटे ठरले कठिण काळामध्ये सरकारने जनतेला दिलासा द्यायला हवा परंतु या सरकारने जनतेला उध्वस्त करण्याचे ठरवले आहे असा घणाघात दशरथ भगत यांनी केला.
महा विकास आघाडीचे सरकार त्रांगडे सरकार असून कुणाचा पायपोस कुणामध्ये नाही याचा त्रास मात्र जनतेला होतो आहे. वीज बिलांमध्ये सवलतीचा निर्णय ऊर्जामंत्री जाहीर करतात परंतु मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये असा कोणत्याही प्रकारचा निर्णय झाला नसल्याचे त्यांचे सहकारी मंत्री म्हणतात. वीजदरवाढीविरोधात शांततेत लोकशाही मार्गाने आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत याचा निषेध करत सतीश निकम यांनी माजी आमदार संदीप नाईक यांनी जाहीर केल्याप्रमाणे या गुन्ह्यांमध्ये बेल घेणार नाही वेळ पडली तर जेलमध्ये जाऊ असा इशारा दिला.
महा विकास आघाडी सरकारने अन्यायाची परिसीमा केली आहे या सरकारचा मनमानी कारभार सुरू असून जनतेचे गाऱ्हाणे ऐकले जात नाही ही अशी खरमरीत टीका अनंत सुतार यांनी केली.
नवी मुंबई शहरातून महावितरणला सर्वात जास्त उत्पन्न विज बिलामधून मिळते त्या नवी मुंबईतील ग्राहकांवर विज दरवाढीचा बोजा टाकण्यात आला आहे असे रवींद्र इथापे म्हणाले आंदोलनादरम्यान कुठे तोडफोड नाही कोणत्या अधिकाऱ्याला काळ बसलं नाही शांततेत निषेध करणाऱ्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी दाखल केलेले गुन्हे अन्यायकारक असल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला. कोरोना काळात महावितरण कडून ग्राहकांना विज बिल वेळेवर देण्यात आली नाहीत त्याचा भुर्दंड मात्र ग्राहकांवर टाकण्यात आला महावितरणची चूक असताना ग्राहकांनी हा भुर्दंड का भरावा? असा सवाल जयवंत सुतार यांनी केला.
कोपरखैरणे येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली  निषेध आंदोलन
कोपरखैरणे येथे माजी आमदार संदीप नाईक यांच्या नेतृत्वाखाली वीज दरवाढ आणि दंडेलशाहीने थकित वीज बिल वसूल करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा जोरदार धिक्कार करण्यात आला. सत्तेचा वापर करून सरकार आंदोलन मोडू पाहत आहे पण तसे होणार नाही. जर वीज दरवाढ मागे घेतली नाही आणि  जबरदस्तीने थकित विद्युत देयके वसूल करण्याची कारवाई सुरू केली तर या विरोधात भाजपा रस्त्यावर उतरून प्रखर आंदोलन छेडेल असा इशारा देत जनतेवरील अत्याचार दूर करण्यासाठी वीजदरवाढीविरोधात पक्षाचे कार्यकर्ते आणि माजी नगरसेवकांनी केलेल्या आंदोलनामध्ये पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. दमनकारी शासनाने दाखल केलेल्या या गुन्ह्यांमध्ये बेल न घेता जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवली आहे असा इशारा माजी आमदार संदीप नाईक यांनी दिला आहे. कोपरखैरणे येथील निषेध आंदोलनात त्यांच्यासमवेत माजी नगरसेवक लीलाधर नाईक माजी नगरसेविका वैशालीताई नाईक आणि आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आंदोलक कार्यकर्त्यांचा सन्मान
आमदार गणेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली मागील वेळेस झालेल्या वीज आंदोलनामध्ये ज्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत त्या कार्यकर्त्यांचा पत्रकार परिषदेमध्ये सन्मान करण्यात आला. जनतेवरील अन्याय नाहीसा करण्यासाठी असे कितीही गुन्हे दाखल झाले तरी फिकीर नाही अशा प्रतिक्रिया या कार्यकर्त्यांनी दिल्या. प्रदीप गवस गिरीश म्हात्रे सुरेश शेट्टी गणेश भगत शिल्पा कांबळे सुनील पाटील सतीश निकम रणजित नाईक प्रदीप राणे घनश्याम मढवी विनायक पोळ रवींद्र हांडे विजय साळे अनिल नाकते दिनेश पारख सुदर्शन जिरगे निकेतन पाटील विनायक पोळ शिवाजी खोपडे वकील संध्या सावंत विजय मिश्रा महेश शर्मा हरेश पाण्डेय राजेश मढवी निवेदिता पोळ इत्यादी माजी नगरसेवक पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर आंदोलनाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 417 total views,  2 views today

Leave a Reply

Your email address will not be published.