खासदार राजन विचारे यांनी ठोकला होता पहाटेपर्यंत ठिय्या
ठाणे : कोपरी पुलाच्या आनंदनगर भुयारी मार्गावरील ७ गर्डर बसविण्याचे काम सकाळी पहाटेपर्यंत सुरू असताना खासदार राजन विचारे यांनी पुलावर रात्री अकरा वाजता आपली उपस्थिती नोंदवली त्यानंतर पहिली गर्डरचे लॉन्चिंग होत असताना त्यांनी शास्त्रीय पद्धतीने ब्राह्मणा द्वारे पूजा करून गर्डर काम सुरू केले सकाळी पहाटे ५ वाजेपर्यंत खासदार राजन विचारे ठिय्या मांडून बसले होते त्याठिकाणी जेव्हा सर्व गर्डर यशस्वीरित्या बसविल्यानंतर खासदार राजन विचारे यांनी सर्व व अधिकारी व कर्मचारी वर्गाचे कौतुक करून त्यांच्यासोबत फोटो काढले त्यावेळी त्यांच्यासोबत सकाळी पहाटेपर्यंत वाहतूक शाखेचे पोलीस आयुक्त बाळासाहेब पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त पालवे एमएमआरडीएचे अधीक्षक अभियंता प्रकाश भांबरे ,कार्यकारी अभियंता विनय सुर्वे उपस्थित होते तसेच स्थानिक नगरसेवक विकास रेपाळे , शिवसैनिक रमाकांत पाटील , किरण नाकती यांनीही रात्री उपस्थिती नोंदिवली होती
सदर गर्डर हा ३५ मीटर लांब व ३५ मेट्रिक टन वजनाचा होता. सदर गर्डर उचलण्यासाठी ५ क्रेन ,५ ट्रेलर व १ पुलर अशी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली होती
536 total views, 1 views today