तिन्ही पक्षांचे नेते जाणून घेणार कार्यकर्त्यांचे मनोगत
नवी मुंबई : महाविकास आघाडीच्या वतीने रविवार १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते १ वाजेपर्यंत वाशी विभागीय कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन आयोजित करण्यात आले आहे. शिवसेना,राष्ट्रवादी,आणि काँग्रेस ह्या तिन्ही पक्षाचे मंत्री व नवी मुंबईतील सर्व प्रमुख नेते या मेळाव्याला उपस्थिती राहणार आहेत.
वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात होणाऱ्या या मेळाव्यात नवी मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणूकी संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार असून, सर्व कार्यकर्त्यांचे मनोगत जाणून घेणार आहेत. तरी महाविकास आघाडी वाशीमधील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ता, उपशहरप्रमुख, विभागप्रमुख, उपविभागप्रमुख, शाखाप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटप्रमुख, युवासेना, उत्तरभारतीय सेल, व महिला आघाडीच्या सर्व स्थानिक पदाधिकारी यांना वेळेवर उपस्थित राहण्याचे आवाहन वाशी विभाग महाविकास आघाडी तर्फे करण्यात आले आहे.
697 total views, 1 views today