वाहन चोरी प्रकरणी पोलिसांनी ठोकल्या एकाला बेड्या

आरोपी कडून पोलिसांनी गाड्यांच्या स्पेअर पार्टसह ५, ५४,५०० रुपये किमंतीचा मुद्देमाल केला हस्तगत

कल्याण : चारचाकी गाड्या चोरून त्यांची विक्री करणाऱ्या एकाला महात्मा फुले पोलीस स्टेशन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तर त्याच्या दुसर्‍या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत. अटक करण्यात आलेल्या आरोपी कडून पोलिसांनी  ५,५४, ५०० रुपये किमंतीचा चोरी केलेल्या गाड्यांचे स्पेअर पार्ट सह मुद्देमाल हस्तगत केला आहे.
कल्याण पश्चिमेतील संपदा रुग्णालय परिसरात राहणाऱ्या जितेंद्र रावरीया या व्यापाराची चार चाकी त्याच्या इमारती बाहेरून चोरीला गेली होती. या प्रकरणी त्यांनी ३१ डिसेंबरला एमएफसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. सदर गुन्ह्याचा  तपास करणाऱ्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे आणि त्यांच्या पथकाने तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपी हे वाहन चोरुन त्यामध्ये बदल करून अथवा त्या गाड्या स्क्रॅब करीत असलेल्या पत्र्याच्या शेडचा शोध लावला आणि कुर्ला येथे राहणाऱ्या मोहम्मद खान याला ११ जानेवारी रोजी अटक केली.
मोहम्मद आपल्या अन्य साथीदारांसह कल्याण, ठाणे, नवी मुंबई येथुन वाहनांची चोरी करून वाहने खालापूर येथील पत्र्याच्या शेडमध्ये नेवून त्यांचे पार्ट किंवा रंगामध्ये बदल करून विकत असे. अशी माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी दिली.

 387 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.