पाण्याचे बिल थकवणाऱ्यांवर महापालिकेची कारवाई

मागील १५ दिवसात थकबाकीदारांच्या २८८ नळजोडण्या खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्यात आलेलाआहे. तसेच आजपर्यत एकूण २००५ जलजोडण्या खंडीत करण्यात आल्या असून ८४ पंप रुम सील करण्यात आले व ३५५ पंप केलेत जप्त


ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने सन २०२०-२१ या आर्थिक वर्षातील पाणी देयके तसेच मागील थकबाकी वसुलीसाठी मोठ्या प्रमाणावर मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेतंर्गत नळ संयोजन खंडीत करुन, पाणी पुरवठा बंद करणे, जप्तीची कारवाई करणे, पंप रुम सिल करणे, पंप जप्त करणे अशा प्रकारची कारवाई करण्यात येत आहे. मागील १५ दिवसात थकबाकीदारांच्या २८८ नळजोडण्या खंडीत करुन पाणी पुरवठा बंद करण्यात आलेलाआहे. तसेच आजपर्यत एकूण २००५ जलजोडण्या खंडीत करण्यात आल्या असून ८४ पंप रुम सील करण्यात आले व ३५५ पंप जप्त करण्यात आले आहेत.
तरी नागरिकांनी पाणी बिल एकरकमी भरणा करुन ‍ ३१ जानेवारीपर्यंत मागील थकबाकीवरील १०० प्रशासकीय आकारामध्ये देण्यात येणाऱ्या सवलतीचा लाभ घ्यावा व आपल्यावर होणारी कारवाई टाळावी असे आवाहन ठाणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे करण्यात आली आहे.

 557 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.