रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर होणार कोविड १९ लस ड्राय रन

महापौर, आयुक्त राहणार उपस्थित

ठाणे : कोविड १९ लसीकरणाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून उद्या, ८ जानेवारी रोजी ठाणे महानगरपालिकेच्या घोडबंदर रोडवरील रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर कोविड १९ लसीकरणाचा ड्राय रन होणार आहे. महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांच्या उपस्थितीत हा ड्राय रन होणार आहे.
कोविड १९ लसीकरणाची पूर्व तयारी म्हणून हा ड्राय रन घेण्यात येणार असून या ठिकाणी लसीकरणासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.
यामध्ये लसीकरणासाठी येणाऱ्या लाभार्थ्यांसाठी प्रतिक्षा कक्ष, नोंदणी कक्ष आणि लसीकरण कक्ष आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर लसीकरण झाल्यानंतर आब्जर्वेशन कक्षही निर्माण करण्यात आला आहे.
या ड्राय रनसाठी रोझा गार्डनिया आरोग्य केंद्रावर काम करणाऱ्या एकूण २५ कर्मचाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यांना तसे संदेश पाठविण्यात आले आहेत. त्यांनी ड्राय रनसाठी कोणत्या वेळेत उपस्थित राहायचे आहे ती वेळही कळविण्यात आली आहे.
दरम्यान लसीकरण करण्यात येणाऱ्या सर्व लाभार्थ्यांची माहिती केंद्र शासनाच्या को-विन(CO-WIN) या ॲपवर अद्ययावत करण्यात आली असून यामध्ये आरोग्य कर्मचारी, डॅाक्टर्स आणि प्रत्यक्ष फिल्डवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.

 455 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.