चार्मिंग प्रिन्स अँड प्रिन्सेस इंडिया सौंदर्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद

स्पर्धेच्या माध्यमातून तरुणांना व्यासपीठ मिळवून देण्याचा केला प्रयत्न

नवी मुंबई : वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृह मध्ये गुरमीत गारा ग्रुमिंग स्कूल आयोजित चार्मिंग प्रिन्स अँड प्रिन्सेस इंडिया या सौंदर्यस्पर्धा च्या पर्वाला उत्तम प्रतिसाद मिळाला. मोठ्या संख्येने युवक युवतीने या सौंदर्य स्पर्धेत भाग घेतला.विशेष म्हणजे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती व प्रमुख परिक्षिक म्हणून २०१६ चे मिस्टर वर्ल्ड विजेते रोहित खंडेलवाल उपस्थित होते.स्पर्धेचे मुख्य आयोजक गुरमित गारा यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की “गेली चार वर्ष या सौंदर्य स्पर्धेचे आम्ही यशस्वी आयोजन करीत आहोत.आमच्या डोळ्यासमोर हेच एक उद्दिष्ट होते की स्पर्धेत भाग घेणाऱ्या प्रत्येकाला एक व्यासपीठ निर्माण व्हावे, त्यांच्यात असलेल्या कलेला प्रोत्साहन मिळावे.यशस्वी करण्यासाठी सर्वच तिने खूप मेहनत घेतली” या सौंदर्यस्पर्धेला
शुभेच्छा देण्याकरिता प्रोॲक्टीव शिफ मॅनेजमेंटचे सर्वेसर्वा प्रसन्नजित कुमार आणि सोमय्या सिंग विशेष उपस्थित होते.कार्यक्रमाचे शो दिग्दर्शन ऋषिकेश मिराजकर यांनी केले. स्पर्धेला यशस्वीरित्या सादर करण्याकरिता पाहूलदिप गारा यांनी क्रियेटिव्ह दिग्दर्शक म्हणून काम बघितले.
एस के ग्रुपचे सर्वेसर्वा डॉ संजीव कुमार, डॉ.विजय शुक्ला , निर्माता संदीप नगराळे व इतर मान्यवर उपस्थित होते.
या स्पर्धेचे विजेते अश्वत गायकवाड, भावी घाडीगांवकर, क्रिष पनवेलकर, पलक सिंग, किशोर कुमार, श्रुष्टी बन्नाटी ठरलेत. गुरमीत गारा ग्रूमिंग स्कूल च्या अध्यक्षा सिया गारा आनंद व्यक्त करीत सांगितले की ज्या प्रमाणे या वर्षी आम्हाला एवढा मोठा प्रतिसाद मिळाला. त्यानुसार आम्ही पुढच्या वर्षी ही स्पर्धा देशपातळीवर घेऊन जाणार आहोत

 310 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.