नवी मुंबईत भाजपाला पुन्हा एकदा पडले खिंडार

नगरसेविका दिव्या गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये दाखल, शिवसेना उपनेते विजय नाहटा यांची घेतली सदिच्छा भेट

नवी मुंबई : वाशी येथील प्रभाग क्रमांक ६४ च्या नगरसेविका दिव्या वैभव गायकवाड आणि प्रभागातील लोकप्रिय व्यक्तिमत्व असलेले माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीला सोडचिठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे उपनेते तथा मुंबई झोपडपट्टी सुधार मंडळाचे सभापती ( राज्यमंत्री दर्जा) विजय नाहटा यांची सदिच्छा भेट घेत मार्गदर्शन घेतले. त्यावेळी नवी मुंबईतून महाविकास आघाडीची संपूर्ण ताकत नगरसेविकादिव्या गायकवाड यांच्या पाठीशी उभी करणार असल्याचे आश्वासन देऊन पुढील राजकीय कार्यास विजय नाहटा यांनी शुभेच्छा दिल्या. नगरसेविका दिव्या गायकवाड व माजी नगरसेवक वैभव गायकवाड यांनी भाजपाला रामराम ठोकल्याने वाशी विभागात भारतीय जनता पार्टीला मोठे भगदाड पडले असल्याचे चित्र दिसत आहे.

 320 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.