नऊ पैकी चार जागा बिनविरोध,पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात

डोळखांब ग्रामपंचायत निवडणूक

शहापूर : शहापूर तालुक्यातील बहुचर्चित डोळखांब ग्रामपंचायतच्या निवडणुकीत नऊ जागांपैकी चार जागा बिनविरोध झाल्या असून उर्वरीत पाच जागांसाठी येत्या १५ जानेवारीला निवडणूक होणार आहे.यात अकरा उमेदवार रिंगणात आहेत.
शहापूर तालुक्यातील अत्यंत प्रतिष्ठेची व बाहुचर्चित अशा डोळखांब ग्रामपंचायतची निवडणूक येत्या १५ जानेवारी रोजी होत आहे.एकूण नऊ सदस्य संख्या असलेल्या या ग्रामपंचायत निवडणुकीत संतोष बाळु गायकवाड,सुवर्णा योगेश भला,बारकी वसंत वाघ,भिमा सुधाकर वाघ हे चार सदस्य बिनविरोध निवडून आले असून उर्वरीत पाच जागांसाठी अकरा उमेदवार रिंगणात आहेत.
यात प्रभाग क्रमांक एक मधुन उज्वला उमाकांत सांबरे विरुध्द पुनम हैबत शिंदे.
प्रभाग दोन मधे शैलेश फर्डे ,रवि फर्डे विरुध्द वसंत चौधरी अशी तिरंगी लढत होत आहे.याच प्रभागातून अनुसूचित जमाती या जागेवर सुधाकर वाघ विरुध्द वसंत वाघ अशी लढत आहे. तर प्रभाग तीन मधून सर्वसाधारण महीला जागेसाठी करुणा चौधरी विरुध्द पुनम शिंदे आणि अनुसूचित जमाती साठी सुरेश मुकणे विरुध्द वसंत वाघ अशी लढत आहे.
गावात तंटे नकोत व एकोपा रहावा म्हणून
येथील जेष्ठ कार्यकर्ते शिवाजी देशमुख , विकास चौधरी, जावेद पटेल हरीभाऊ शिंदे ,यशवंत जाधव व उपसरपंच सागर देशमुख यांनी विशेष प्रयत्न करून चार जागा बिनविरोध केल्या असून सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.मात्र काही मंडळींच्या अट्टहासापायी हि निवडणूक डोळखांबकरांच्या माथी मारल्याने मतदारांनी मात्र नाराज व्यक्त केली आहे.
डोळखांब ग्रामपंचायतच्या निवडणुकीसाठी विजय लाडे हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम बघणार आहेत
.

 491 total views,  1 views today

Leave a Reply

Your email address will not be published.